दशक्रियासाठी आलेल्या महिलेचा मोबाइल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 01:29 IST2022-06-13T01:29:11+5:302022-06-13T01:29:46+5:30

गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या राजस्थानच्या महिलेचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल पर्समधून लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mobile lamp of the woman who came for Dashakriya | दशक्रियासाठी आलेल्या महिलेचा मोबाइल लंपास

दशक्रियासाठी आलेल्या महिलेचा मोबाइल लंपास

पंचवटी : गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या राजस्थानच्या महिलेचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल पर्समधून लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी घडली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सकाळी महाडिक हे त्यांच्या काकांच्या दशक्रिया विधीसाठी गोदाघाटावर आल्या होत्या. त्यांनी हातातील पर्स बाजूला ठेवून त्या पूजा करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेला पंधरा हजारांचा मोबाइल चोरून नेला. गेल्या काही दिवसांपासून पंचवटीत पुन्हा मोबाइल चोरी करणाऱ्या टोळक्याचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे मात्र पोलिसांच्या हाती मोबाइल चोर लागत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mobile lamp of the woman who came for Dashakriya