शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या मनसेचे थिएटर रिते

By admin | Updated: February 26, 2017 00:06 IST

नवनिर्माणाचा फ्लॉप शो : स्थानिक स्तरावर नेतृत्वाचा अभाव

नाशिक : एकमेव स्टार प्रचारक. ७५ टक्के नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने खचलेले मनोधैर्य. स्थानिक स्तरावर प्रभावी नेतृत्वाचा अभाव. राजकारणाबाबत अननुभवी कार्यकर्त्यांची फळी. अशा पराभूत मानसिकतेत निवडणुकीच्या तोंडावर उद्योजकांच्या खिशात हात घालून केलेल्या दोन-चार प्रकल्पांचे भांडवल करत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा नाशिककरांना दुसऱ्या पर्वाचे स्वप्न दाखविले, परंतु दरवेळी नवीन चित्रपटाचा खेळ पाहणाऱ्या नाशिककरांनी मनसेच्या थिएटरसमोरील ‘हाऊसफुल्लं’चा फलक काढून तो भाजपाच्या थिएटरसमोर लावून ठेवला. त्यातून मनसेची संख्या ४० वरून पाचवर आली.  सन २०१२ मध्ये चाळीस नगरसेवक निवडून येत सत्तारूढ झालेल्या मनसेने नाशिककरांना नवनिर्माणाचे सुरुवातीपासून जे काही स्वप्न दाखविले, ते प्रत्यक्षात उतरवताना पक्षाची दमछाक झाली आणि राज यांनी ज्यांच्या हाती सत्तापदे सोपविली ते कचखाऊ निघाल्याने पक्षाची वाताहत झाली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ३० नगरसेवक सोडून गेले. उद्योजकांना हाताशी धरून जे काही प्रकल्प साकारले त्यांचे प्रभावी ब्रॅँडिंग करण्यात स्थानिक नेतेमंडळी कमी पडली.  महापालिकेच्या माध्यमातून ठोस अशी कामगिरी नाही. ना उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न, ना सुशासन. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडूनआलेल्या निधीतून झालेले घाट-रस्ते-सुशोभिकरण. अन्य कामांसाठी कर्जदार झालेली महापालिका. असे वास्तव असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा नवनिर्माणाची भाषा करून पाहिली. राज ठाकरे यांच्या सभेने थोडेफार मनोधैर्य वाढविले होते, परंतु गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही, हीच खरी मनसेबाबत शोकांतिका आहे. त्यातल्या त्यात राज यांनी विकासकामांचे सादरीकरण दाखवतानाच शहराला भेडसावणाऱ्या कपाट, टीडीआरच्या प्रश्नाला हात घातल्याने पक्षाविषयी थोडीफार धुगधुगी वाढली होती. परंतु, ‘माझा शब्द’ म्हणवताना राज यांनी जे अस्तित्वात आहे त्यालाच नवीन वेष्टन लावून सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याऐवजी नवनिर्माणाची परिभाषा समजावून सांगताना आणखी नवीन काय करणार, यावर भर दिला असता तर आणखी दोन-पाच जागा हाती येऊ शकल्या असत्या.