MNS will contest 15 seats in Nashik district | आता नाही माघार, मनसेने केला निर्धार; नाशिकमधल्या सर्व जागा लढवणार!

आता नाही माघार, मनसेने केला निर्धार; नाशिकमधल्या सर्व जागा लढवणार!

ठळक मुद्देकाल घोषणा आज मुलाखतीअनेक महिन्यांनी राजगठावर गर्दी

नाशिक : पुन्हा मैदानात उतरायचयं, ते जिंकण्यासाठीच असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व म्हणजे पंधराच्या पंधरा जागा लढवणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या गजबजलेल्या पक्ष कार्यालयातील बैठकीत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनोज घोडके, सुजाता डेरे, अर्चना जाधव, भानुमती अहिरे आदी पदाधिकारी आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणूकीत या पक्षाने सपाटून मार खाल्यानंतर पक्ष कार्यालय ओस पडले होते. मात्र, सुमारे दोन वर्षांनी आज प्रथमच राजगडावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

या बैठकीत बोलताना पानसे यांनी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. या सरकारने केवळ भूमिपूजने आणि घोषणा करण्यातच त्यांचा सगळा काळ खर्च केला. हे केवळ बोलघेवडे सरकार असून, त्यांनी सामान्यांच्या समस्यांमध्ये भर घालण्याचेच काम केले आहे. त्यामुळे या सर्व बाबी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन सांगाव्यात. त्यातूनच या सरकारच्या विरोधी जनमत तयार होणार असून, हे जनमतच निर्णायक ठरेल, असा विश्वास पानसे यांनी व्यक्त केला.

२००९ मध्ये मनसेने सर्व प्रथम निवडणूक लढविली तेव्हा विधान सभेच्या १३ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले होते त्यातील तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. २०१४ मात्र मनसेने सर्व जागा गमविल्या होत्या. मात्र आता पुन्हा मनसेच्या आव्हानामुळे नाशिक शहरात आणि जिल्ह्यात रंगत वाढणार आहे.

Web Title: MNS will contest 15 seats in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.