शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मनसेने घेतला शिवसेनेचा बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 1:02 AM

महापालिकेत अवघे पाच नगरसेवक असूनही किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे दिसत होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. राज ठाकरे यांनी मध्यरात्री पाठविलेल्या नेत्यांनी भाजपला पाठिंबाच नव्हे तर थेट उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिलेच त्यानुसार पक्षादेशदेखील बजावण्यात आले. या घटनेनंतर वातावरण फिरू लागले.

नाशिक : महापालिकेत अवघे पाच नगरसेवक असूनही किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे दिसत होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. राज ठाकरे यांनी मध्यरात्री पाठविलेल्या नेत्यांनी भाजपला पाठिंबाच नव्हे तर थेट उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिलेच त्यानुसार पक्षादेशदेखील बजावण्यात आले. या घटनेनंतर वातावरण फिरू लागले. मनसेने दिलेल्या पाठिंब्याविषयी उलट सुलट चर्चा होत असली तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेने केलल्या पळवापळवीचा बदला यानिमित्ताने घेतल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.महापालिकेत मनसेच्या पाच आणि एक अपक्ष असा सहा नगरसेवकांचा गट होता. भाजपसमोर बहुमताचा प्रश्न उद््भवल्यानंतर कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसे या पक्षांना महत्त्व आले होते. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्टÑवादीला आपल्याबरोबर असल्याचा दावा केला होता. मात्र मनसेच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली जात होती. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सर्व नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांच्यावरच निर्णय सोपवला होता. मात्र, मनसे भाजपबरोबरच जाईल अशी अटकळ बांधली जात होती. त्यादृष्टीने मनसेची पावले पडत होती. मध्यरात्री मनसेचे संदीप देशपांडे आणि अभिजीत पानसे यांनी घोटी येथे सहलीवर असलेल्या मनसे नगरसेवकांची भेट घेतली आणि मनसेला मतदान करण्याचा निर्णय स्पष्ट केला.या स्पष्टतेनंतर रात्रीच गटनेता नंदिनी बोडके यांच्या स्वाक्षरीचे व्हीप करून ते सर्व नगरसेवकांना बजावण्यात आले. पक्षाच्या नगरसेविका अ‍ॅड. वैशाली भोसले या रविवारपेठेतील त्यांच्या घरी उपलब्ध नसल्याने पक्षादेश त्यांच्या घरावर चिटकवण्यात आला आणि मोबाइलवर त्यांना माहिती देण्यात आली. मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर मात्र शिवसेनेचा ताण वाढला. दरम्यान, कॉँग्रेसनेदेखील हटवादी भूमिका घेतल्यानेदेखील अडचणी निर्माण झाल्या. तथापि, मनसेची भूमिका निर्णायक ठरली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवक शिवसेनेने पळविले होते. त्यामुळे राज यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला नसल्याचे सांगण्यात आले.उघड नाराजीमहापालिकेत पक्षाने घेतलेल्या भूमिकेविषयी मात्र पक्षाचे माजी आमदार नितीन भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्तकेली आहे. मोदीमुक्त देशाची घोषणा करताना मोदीयुक्त मनसे कधी झाली हे कळलेच नाही, आपल्या घरावर पक्षादेश लावल्यानंतर हा प्रकार कळला, असे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांची नाराजी उघड झाली आहे.मनसेने भाजपला मतदान करण्याचा निर्णय का घेतला हे कळले नाही. पक्षात विचारण्याची सोय नाही. त्यामुळे भविष्यात काय करायचे त्याबाबत कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना विचारून पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येईल.- नितीन भोसले,माजी आमदार, मनसे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाMNSमनसेBJPभाजपा