शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 5:26 PM

संशयित पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अ‍ॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्दे‘विधानसभा सदस्य’स्टिकर चा वापरउच्चपदांच्या नावांचे स्टिकर असलेल्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर

नाशिक : मुंबई येथील एका अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीच्या नावाखाली देवळा तालुक्यातील एका शेतक-याला सुमारे पाच कोटी २३ लाख रुपयांचा बनावट धनादेश देत विश्वास संपादन करुन प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली १८ लाख ६० हजाराची रोकड घेऊन फसवणूक करणा-या दोघा भामट्यांच्या मुसक्या गंगापूर पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून रोकडसह बनावट धनादेश, मोबाईल, टाटा सफारी मोटार असा एकूण २५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर पोलीस ठाण्यात मागील गुरूवारी (दि.९) देवळा तालुक्यातील लोहणेर येथील शेतकरी धनंजय एकनाथ महाजन (४१) यांना संशयित राकेश बापू पानपाटील (३३, रा.जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (२३, रा.ना.रोड) यांनी मुंबईच्या बालाजी फायनान्समार्फत क र्ज प्रकरण मंजूरीचे आमीष दाखवून सुमारे १८ लाख ६० हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महाजन यांनी संशयितांविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपासचक्रे फिरविली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक समीर वाघ यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाघ यांच्या पथकाने सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सापळा रचला. औद्योगिक वसाहतीमध्ये दोघे संशयित आले असता पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. दोघांची कसून चौकशी केली असता पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अ‍ॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विधानसभा सदस्य’स्टिकर चा वापरफसवणूकीच्या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेल्या टाटा सफारी मोटारीवर ‘आमदार- विधानसभा सदस्य’ असे स्टिकर लावण्यात आले होते. एकूणच चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या मोटारीवर कोणाला संशय येऊ नये, तसेच पोलिसांच्या नाकाबंदीमधून सहजरित्या निसटता यावे, या उद्देशाने चक्क आमदाराचे स्टिकर लावल्याचे उघडकीस आले आहे. एकूणच शासकिय, राजकिय महत्त्वांच्या व्यक्तींच्या नावांचा व पदांचा गैरवापर होण्याच्या घटना वाढल्या आहेत. उच्चपदांच्या नावांचे स्टिकर असलेल्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर यापुढे राहणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाvidhan sabhaविधानसभा