नाशिकच्या एका कथित आधाराश्रममध्ये अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार

By अझहर शेख | Published: November 24, 2022 05:13 PM2022-11-24T17:13:55+5:302022-11-24T17:14:39+5:30

संशयित संचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

minor girl was raped by showing a porn video in an alleged aadhaar ashram in nashik | नाशिकच्या एका कथित आधाराश्रममध्ये अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार

नाशिकच्या एका कथित आधाराश्रममध्ये अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून बलात्कार

Next

नाशिक : शहरातील म्हसरूळ शिवारातील एका कथित आधाराश्रमात चौदा वर्षाच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली आहे. म्हसरुळ पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल बाळकृष्ण मोरे (२८,मुळ रा.सटाणा) यास बेड्या ठोकल्या आहे. दोन दिवसांपुर्वीच नाशिक शहरापासून जवळच असलेल्या एका ‘आधारतिर्थ’ नावाच्या आधाराश्रमात चारवर्षीय चिमुकल्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

नाशिक शहर व परिसरातील काही कथित खासगी बेकायदेशीर आधाराश्रम, वसतीगृहांमधील गैरप्रकार वारंवार समोर येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच समाजाचा स्वयंसेवी सामाजिक संस्थांच्या कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोनदेखील बदलू लागला आहे. म्हसरुळ शिवारात अशाच एका कथित द किंग फाउण्डेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदिप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापुर्वी तेथील स्वयंघोषित संचालक संशयित हर्षल मोरे याने पिडित फिर्यादी अल्पवयीन मुलीला बळजबरीने इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बोलावून हातपाय दाबून देण्याच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगित अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

हा प्रकार संशयिताने १३ ऑक्टोबर२०२२ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास केला. यावेळी पिडितेने नकार दिला असता तिला त्याने होस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी दिली. पिडितेचा हात बळजबरीने पकडून तिला पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात हातपाय दाबून देण्यासाठी भाग पाडले. यावेळी अश्लील व्हिडिओ मोबाइलमध्ये पिडितेला बळजबरीने दाखविला. यानंतर पिडितेसोबत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडिता ही जिल्ह्यातील एका आदिवासी तालुक्याील मुळ रहिवाशी आहे.

घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पिडितेला विश्वासात घेत तिची रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करुन घेत संशयित हर्षल यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्याकडे देण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: minor girl was raped by showing a porn video in an alleged aadhaar ashram in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.