शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मन हो रामरंगी रंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:23 IST

नाशिक : कोट्यवधी नेत्रांना लागलेली शतकांची आस...अन्् दशकांपासून बघितलेल्या एका स्वप्नपूर्तीचा साजसोहळा...बुधवारी प्रत्यक्षात साकारणार आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) होणार आहे.

ठळक मुद्देउत्सव : समस्त पंचवटी, तपोवनातील मंदिरांमध्ये रोषणाई

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोट्यवधी नेत्रांना लागलेली शतकांची आस...अन्् दशकांपासून बघितलेल्या एका स्वप्नपूर्तीचा साजसोहळा...बुधवारी प्रत्यक्षात साकारणार आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) होणार आहे. प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिकभूमीला जणू आनंदाचे उधाण आले आहे. त्यामुळेच नाशिकमधील संत, महंतांच्या आश्रमांसह सामान्य नागरिकांची मने आणि पंचवटी, तपोवनातील मंदिरे मंगळवारपासूनच जणू राम रंगी रंगल्यासारखी झाली होती.प्रभू श्रीरामांचे वास्तव्य ज्या दंडकारण्यात आणि नाशिकच्या पवित्र भूमीत प्रदीर्घ काळ होते, त्या भूमीतील प्रत्येकाच्या मनात अयोध्येत मंदिराचे पुनर्निर्माण होत असल्याचा आनंद अगदी ओसंडून वहात आहे. त्यामुळेच कुठे गुढी उभारली, कुठे दीपोत्सव, कुठे रांगोळीने स्वागत, तर कुठे घंटानादाचे आयोजन अशी लगबग समस्त नाशिकमधील मंदिर, मठांमध्ये दिसून येत आहे. ज्या पंचवटीच्या परिसरात प्रभू श्रीरामांचे वास्तव्य होेते, त्याच परिसरात उभ्या असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरातही मंगळवारीच दीपोत्सव करून लखलखाट करण्यात आला. त्याशिवाय बुधवारी पहाटे नियमित काकडआरती, सकाळी पाद्यपूजनाचा दैनंदिन सोहळा पार पाडला जाणार आहे. तसेच माध्यान्हीच्या नियमित आरतीनंतरदेखील घंटानादाने या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला जाणार आहे, तर कपालेश्वर मंदिरामागील शौनकाश्रम परिसरात उभारलेल्या गुढीनेदेखील समस्त पंचवटीवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. समस्त पंचवटी आणि तपोवनातील मंदिर, मठांवर मंगळवारपासूनच भगव्या रंगाची जणू शाल पांघरल्यासारखे भासत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्यास मोजक्याच लोकांना जाता येणार असल्याने त्यात नाशिककरांना संधी मिळालेली नसली तरी त्याचा खेद न मानता समस्त नाशिककर रामनामाच्या जयघोषात दंग झाले आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याkalaram templeकाळाराम मंदीर