दूध आंदोलन आणखी तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 17:54 IST2020-07-18T17:50:19+5:302020-07-18T17:54:55+5:30
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा या प्रमुख मागाणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दूध आंदोलन आणखी तीव्र करणार
नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा या प्रमुख मागाणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी ३० ते ३५ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. सध्या परिस्थिती काही प्रमाणात पूर्व पदावर येऊन सुध्दा शेतक-यांना दुधासाठी केवळ १७ रुपये प्रति लिटर दर दिला जात आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दिला जाणारा हा दर अत्यंत तोकडा आहे.सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी १० लाख लिटर दुध खरेदी करून त्यापासून पावडर बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ मोजक्या सहकारी संघांना लागू करण्यात आला होता. राज्यात एकूण दूध संकलनापैकी ७८ टक्के दूध संकलित करणाºया खाजगी संघ व कंपन्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. परिणामी राज्यातील केवळ १२ तालुक्यातील शेतकºयांनाच या योजनेचा अंशत: लाभ मिळाला. अटी व शर्तीमुळे १० लाख लिटर पैकी प्रतिदिन केवळ निम्मेच दूध सरकार खरेदी करू शकले. सरकारच्या अशा अपुºया व पक्षपाती हस्तक्षेपामुळे शेतकºयांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेतर्फे डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी केला आहे.