शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळ अतिक्र मण प्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: November 24, 2014 00:02 IST

म्हसरूळ अतिक्र मण प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भटक्या विमुक्त जाती संघाचे संस्थापक सरचिटणीस जी. जी. चव्हाण, कल्पना पांडे, संजय धुर्वे यांच्यासह अतिक्रमणधारकांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणचे अतिक्रमण महानगरपालिकेने जमीनदोस्त केले आहे.
मनपा विभागीय अधिकारी अशोक पांडुरंग वाघ यांना १४ नोव्हेंबर रोजी नगरसेवक रंजना भानसी व अरुण पवार यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील सर्व्हे नंबर २५७, २५९ या मनपाच्या मोकळ्या भूखंडावर १५० ते २०० लोक झोपड्या टाकून अतिक्र मण करीत असल्याची माहिती दिली होती़ यानुसार विभागीय अधिकारी वाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे चव्हाण, पांडे, धुर्वे यांच्यासह इतर कार्यकर्ते या मोकळ्या भूखंडावर फलक लावून पूजा करीत होते. त्यामुळे वाघ यांनी त्यांना, तुम्ही जागेचे बेकायदेशीरपणे वाटप करून देत आहात, तुमच्याकडे मनपा प्रशासनाची परवानगी आहे का? अशी विचारणा केली. त्यावर संशयितांनी सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे; परंतु जागेबाबत इतर कोणतीही परवानगी नाही.
विभागीय अधिकारी वाघ यांनी संबंधितांना या जागेवर अतिक्र मण न करण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांनी गोंधळ घालून अधिकाऱ्यांना तेथून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त आऱ एम़ बहिरम यांच्या आदेशानुसार वाघ यांनी रविवारी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात अतिक्र मण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नाशिक महानगरपालिकेने हे अतिक्र मण गुरुवारी (दि. २०) हटवले. त्यावेळी संतप्त झोपडपट्टीवासीयांनी महापालिका व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता़ (प्रतिनिधी)