म्हसरूळला पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:12 IST2020-07-14T15:11:40+5:302020-07-14T15:12:05+5:30
भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

संग्रहित छायाचित्र
पंचवटी : भावाला का मारले याची विचारणा करून आमच्या भागातील मुलांना मारतो असे म्हणत पूर्ववैमनस्यातून एकाच्या
डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना म्हसरूळ येथिल हरिहर नगरला घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुलमोहर नगर येथिल सुमित सुधीर लाल याने तक्रार दाखल केली आहे.
गेल्या रविवारीरात्री आठ वाजता हरिहर नगर येथिल समर्थ किराणा दुकानासमोर लाल उभे असतांना संशयित आरोपी आकाश किरण काळे, साहिल किरण काळे, मयुर संजय उशिरे, रवि उशिरे सर्व राहणार म्हसरूळ यांनी लाल याला मारहाण व शिवीगाळ करत मागील भांडणाची कुरापत काढली व एकाने हातातील धारदार कोयत्याने लाल याच्या डोक्यावर वार केला.
भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.