जखमी शालकाची दुचाकी मेव्हण्याने लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 01:17 AM2021-11-04T01:17:34+5:302021-11-04T01:18:28+5:30

शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका व्यक्तीची दुचाकी त्याच्या मेव्हण्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी गोकुळ लक्ष्मण दिवे (रा. ओझरखेड, गिरणारे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

Mevhanya lengthened the injured Shalaka's bike | जखमी शालकाची दुचाकी मेव्हण्याने लांबविली

जखमी शालकाची दुचाकी मेव्हण्याने लांबविली

googlenewsNext
ठळक मुद्देतपोवन, पंचवटीतूनही चोरट्यांकडून दुचाकी लंपास

नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका व्यक्तीची दुचाकी त्याच्या मेव्हण्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी गोकुळ लक्ष्मण दिवे (रा. ओझरखेड, गिरणारे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

दिवे जखमी अवस्थेत गेल्या ७ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे मेव्हणे संशयित रमेश बाबुराव चौघुले यांनी त्यांच्या खिशातून मोटारसायकलची किल्ली काढून घेत रुग्णालयाच्या आवारातून युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५ एचजे २०७३) चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूरेश विजय भालेराव (रा. तिरुपती नगर, दसक) हे मंगळवारी (दि. २) तपोवन रोड भागात कामानिमित्त गेले होते. त्यांनी आपली पॅशन (एमएच १५ एफएल ४०७१) दुचाकी पार्क केली असता, चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरावाडीतील मनोहर सदाशिव आहिरे यांची ॲक्टिव्हा (एमएच १५ एफएच ५६३८) सोमवारी (दि. १) दुपारच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी चोरून नेली.

Web Title: Mevhanya lengthened the injured Shalaka's bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.