शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारी पणती...

By admin | Updated: October 25, 2016 23:34 IST

प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारी पणती...

येवला : तीमिराकडून तेजाकडे.. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा कृतीतून संदेश देणारी पणती तयार करण्यात सध्या कुंभार गुंतले आहेत. या कुंभारांचेही जीवन या पणतीप्रमाणेच आहे. तळहातावर मातीचा गोळा घेऊन शेकडो वर्षांपासून दिवाळीला पणत्या आणि बोळकीसह मातीच्या वस्तू आजही बनवत आहे. पणत्यातून जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवत असलेल्या कुंभाराला मात्र आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. येवला तालुक्यात काही मोजक्या गावांत मातीचे साहित्य तयार करण्याचे काम कुंभार लोक करीत आहेत. ग्राहक स्वस्त पणत्याला पसंती देत असतो. सध्या या मातीच्या भांड्याच्या कामापासून कुंभार परवडत नसल्याने दूर जात असल्याचे चित्र आहे. चिनी मातीच्या पणत्या बाजारात आल्यापासून मातीच्या पणत्यांचा भाव कमी आणि मागणीही कमी झाली आहे. कुंभार समाजातील अनेकांना या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही आर्थिक साधन नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु पूर्वापार चालत आलेला पारंपरिक व्यवसाय अंगवळणी पडला असल्याचे रसाळ यांनी सांगितले. थोडी शेती आणि मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करीत मुलांचे शिक्षण चालू आहे.पर्यावरणपूरक असलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी सध्या कमी झाली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना कुंभार कामाची कला शिकविण्याची इच्छा अजिबात नाही. शिक्षण देऊन मुलांचे भवितव्य घडवायचे असे विचार अंबादास रसाळ यांनी मांडले. व्यवसायात अधिक आधुनिकता आणायची म्हटले तर पैसे कोठून आणायचे? शासनाने या व्यवसायाला मदत करायला हवी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)