शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

‘पत्रकार सायकल रॅली’तून आरोग्य सुंदरतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:13 AM

नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देपत्रकार दिन : माध्यम प्रतिनिधींचा उत्स्फू र्त प्रतिसादकॅन्सर हॉॅस्पिटलच्या प्रांगणातून निघालेली ही सायकल रॅली

पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘पत्रकारबांधव सायकल रॅली’चे उद्घाटन करताना भरतकुमार राऊत. समवेत ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, मिलिंद सजगुरे, किरण लोखंडे, चंदुलाल शहा, हरिष बैजल, डॉ. राज नगरकर, प्रवीणकुमार खाबिया आदी

नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते.मुंबई-आग्रा महामार्ग येथील डॉ. राज नगरकर संचलित एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटलच्या प्रांगणातून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या आगळ्यावेगळ्या रॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. पांढरा आणि लेवेंडर अशी आकर्षक रंगसंगती असलेला टी शर्ट परिधान करत शहरातील विविध माध्यम प्रतिनिधींनी या सायकल रॅलीत सहभाग घेतला. कुठलीही स्पर्धा नसलेल्या या सायकल रॅलीत प्रत्येक प्रतिनिधी रॅलीचे निर्धारित अंतर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत होते.कॅन्सर हॉॅस्पिटलच्या प्रांगणातून निघालेली ही सायकल रॅली मुंबई नाका, कुटे मार्ग, चांडक सर्कल, संभाजी चौक, गोविंदनगर लिंक रोड मार्गे पुन्हा मुंबई नाका या मार्गावरून काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीचा पुन्हा हॉस्पिटलच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी माध्यम प्रतिनिधींपैकी तीन पत्रकारांची सोडतीतून निवड करण्यात येऊन त्यांना आकर्षक सायकल भेट देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे दिनेश अमृतकर, लोकसत्ताचे मनोज मोरे, ई टीव्ही नेटवर्क १८चे रत्नदीप रणशूर यांचा समावेश होता.दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार भरतकुमार राऊत, मानवता क्युरी कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. राज नगरकर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे, देशदूतचे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.समारोपाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. राज नगरकर यांनी प्रत्येकाने आरोग्य निरोगी रहावे यासाठी आजपासूनच व्यायाम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. नाशिक शहराला हवामानाच्या दृष्टीने लाभलेली निसर्गदत्त देणगी कायम रहावी, अशी आशा व्यक्त केली. यावेळी प्रवीणकुमार खाबिया, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल यांनी मनोगतात सायकलिस्टतर्फे राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सुखदा तेलंग तर आभार अ‍ॅॅड. वैभव शेटे यांनी मानले.सायकल ट्रॅक होण्यासाठी प्रयत्न व्हावेतसायकलपटूंचे शहर म्हणून उदयास येत असलेल्या नाशिक शहरात सर्वत्र सायकल ट्रॅक विकसित होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुतफर् ा सायकल ट्रॅक असण्यात गैर काय आहे, असा सवाल भरतकुमार राऊत यांनी यावेळी उपस्थित करताना ट्रॅक साकारण्यासाठी नाशिक मनपा आपली जबाबदारी झटकते ही चुकीची बाब आहे. पत्रकारांसाठी सहसा उपक्रम राबविण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीत, परंतु नाशिक सायकलिस्टतर्फे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली हा स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगताना राऊत यांनी पत्रकार आणि सायकल यांचे अतुट नाते असून पुण्यात आजही अनेक पत्रकार सायकलवर बातमीदारी करताना दिसतात, असे सांगितले.