Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:31 IST2026-04-12T10:31:09+5:302026-04-12T10:31:09+5:30
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी एसआयटीने त्याच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्या माध्यमातून पथकाने भक्कम पुरावे गोळा केले असून, फॉरेन्सिक टीमच्या अहवालातील सत्य आता बाहेर येत आहे.

Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
नाशिक : भोंदू अशोक खरातच्या तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी एसआयटीने त्याच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्या माध्यमातून पथकाने भक्कम पुरावे गोळा केले असून, फॉरेन्सिक टीमच्या अहवालातील सत्य आता बाहेर येत आहे. विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, केबिनच्या आतील कडी यावरील हाताचे ठसे खरात याचेच असल्याचे स्पष्ट झाले असून, पीडितांवर अत्याचाराचे काही अनुषंगिक पुरावेही तपास पथकाच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, खरात याची पत्नी कल्पना अजूनही फरारच आहे.
पीडित महिलांची त्याच्या कॅबीनमध्ये खरातसोबत झटापट झाली नसल्याची बाब अहवालात नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात जप्त केलेली औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सेनेटायझरची एक बाटली, केबीनच्या आतील कडी या महत्त्वाच्या वस्तूंवर किंवा दरवाज्यावर सापडलेले ठसे भोंदू खरातचेच असल्याचे उघड झाले आहे. या वस्तूंचा वापर करून खरात पीडितांना आपण सांगू ते करण्यास भाग पाडत होता, असा आरोप आहे.
पीडितांचे ठसे या वस्तूंवर आढळून आले नसले, तरी पीडितांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न खरातने केल्याचे अन्य काही पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. हेच पुरावे खरातला दोषी ठरविण्यासाठी तपास यंत्रणेसाठी महत्त्वाचे असतील, असे सांगण्यात येत आहे. भोंदू अशोक खरातवर शिर्डी, सिन्नर, नाशिक अशा वेगवेगळ्या भागांत एकूण १६ गुन्हे दाखल झाले असून, यात लैंगिक अत्याचाराचे स्वतंत्र आठ गुन्हे दाखल आहेत.
भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
"तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
उद्या संपणार पोलीस कोठडीची मुदत
एसआयटीचे अधिकारी अमोल भारती यांच्या उपस्थितीत कॅनडा कॉर्नर येथील भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी पुन्हा तपासणी केली. यात काही पुरावे एसआयटीने गोळा केले. खरातच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. १३) संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या दृष्टीने खरातभोवतीचा चौकशीचा फास घट्ट आवळला जावा, यासाठी तपास यंत्रणेने अधिक खबरदारी घेतली आहे.
भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
खरातच्या पत्नीच्या मैत्रिणी, नोकरांकडे चौकशी
खरातची पत्नी कल्पना नाशिकच्या घरून फरार झाली होती. दहा दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आले असून, कल्पनाच्या माहेरी तसेच माहेरच्या तिच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्याचे वृत्त आहे. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी, तसेच तिच्या घरी सध्या काम करणाऱ्या अन् यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली. पथकाला काही ठोस मिळाले नाही. त्यामुळे फरार कल्पना आहे तरी कुठे, हे गूढ वाढले आहे.