शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

By admin | Updated: September 12, 2015 23:31 IST

ठाकरे कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

सिडको : येथील तानाजी चौकात राहणाऱ्या नेहा ठाकरे या बालिकेचा घंटागाडीच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. महापौर अशोक मुर्तडक यांनी ठाकरे कुटुंबीयांंच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.सिडकोतील प्रभाग क्रमांक ४३ मध्ये राहणाऱ्या नेहा ठाकरे या बालिकेला गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना घराजवळच घंटागाडीने धडक दिली. यात नेहाच्या डोक्यास जबर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात दिवसभर शोकाकुल वातावरण पसरले होते. घटनास्थळी जमलेल्या रहिवाशांबरोबरच राजकीय नेत्यांनीही लगेचच याबाबत आवाज उठविला व घंटागाडी चालकाबरोबरच ठेकेदारावरही कारवाई करावी, तसेच मयत नेहाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी यासाठी पुढाकार घेतला. मयत नेहाचा अंत्यविधी मोरवाडी येथील अमरधाम येथे करण्यात आला.मयत नेहाचे वडील जिजाबराव ठाकरे हे टेम्पो चालवून उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने नेहाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, अ‍ॅड. अरविंद शेळके, कल्पना चुंभळे, सिडको प्रभाग सभापती कांचन पाटील यांसह सर्वच पक्षांचे नगरसेवक राजकीय नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. दरम्यान, अद्यापपर्यंत त्यांना कोणतीही मदत मिळाली नसली तरी आम्हाला न्याय मिळावा, अशीच विनंती मयत नेहाचे वडील जिजाबराव ठाकरे यांनी केली आहे. (वार्ताहर)''सिडको भागातील अंतर्गत रस्त्यालगत नागरी वसाहत आहे. यामुळे या रस्त्यांवरून नागरिकांचा कचरा गोळा करण्यासाठी सध्या जी घंटागाडी आहे, ती मोठी पडते. यामुळे आगामी काळात सिडकोतील अंतर्गत रस्त्यांसाठी लहान आकाराची घंटागाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार.- अशोक मुर्तडक, महापौर