मातोरीची पाइपलाइन पुन्हा फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:30 IST2018-08-30T00:30:03+5:302018-08-30T00:30:37+5:30
मातोरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन समाजकंटकांनी दुसºयांदा फोडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, गावाला वेठीस धरू पाहणाºया समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मातोरीची पाइपलाइन पुन्हा फोडली
मातोरी : मातोरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन समाजकंटकांनी दुसºयांदा फोडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, गावाला वेठीस धरू पाहणा-या समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी काही मद्यपींनी फोडून मुख्य पाइपलाइनचा पाइप चोरून नेला होता. याबाबतची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांना कळवून ग्रामपंचायतीने याबाबत पोलिसांत तक्रार केली नव्हती. उलट फिल्टरचा पाइप व चोरीला गेलेला पाइप जोडून घेऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत केला होता. परंतु पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून, काही समाजकंटकांनी पुन्हा मुख्य पाइपलाइन फोडली असून, वारंवार गावाची पाइपलाइन फोडली जात असल्याने समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी तक्रार ग्रामपंचायतीने तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. पाइपलाइन परिसरात रात्रीच्या वेळी बसणाºया दारुड्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.