शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फ क्लब मैदानावर आज महाआरोग्य शिबिर

By admin | Updated: December 31, 2016 23:45 IST

तयारी पूर्ण : पालकमंत्र्यांचे शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गोल्फ क्लब मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तयारीची शिबिराच्या पूर्वसंध्येला पाहणी केली. पालकमंत्र्यांनी स्वयंसेवकांना तसेच कृती समित्यांच्या प्रमुखांसह कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना नियोजनानुसार जबाबदारी पार पाडीत शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच शिबिरासाठी उपस्थित डॉक्टरांशीही विचारविनिमय केला.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तयारीची पाहणी करताना उपस्थित स्वयंसेवक तथा कृती समिती प्रमुखांशी संवाद साधला. शिबिरासंदर्भात असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेत कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. नाशिक शहराने ज्याप्रमाणे कुंभमेळा यशस्वी करून दाखवला त्याचप्रमाणे हा आरोग्याचा महाकुंभही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करताना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाखो रुग्णांच्या आजारांचे निदान व त्यांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने हा कीर्तिमान ठरणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देऊन त्यांच्या आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबिरात सहभागी स्वयंसेवक व डॉक्टरांना सर्व सुविधा तसेच जेवण व पाणी जागेवर मिळणार असून, शिबिराच्या वेळेत कोणीही आपले स्थान सोडून रुग्णांची गैरसोय होऊ देऊ नये, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, शिबिराचे मुख्य समन्वयक रामेश्वर नाईक, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुहास फरांदे, वसंत गिते, सुनील बागुल, डॉ. प्रशांत पाटील, गोपाळ पाटील, मिलिंद शंभरकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते. दरम्यान, आतापर्यंत ५० हजारहून अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी झाली असून, अनेकांची प्राथमिक नोंदणीही करण्यात आली आहे. या सर्वांना नोंदणी केंद्रावर नोंद करून शिबिरात उपचार घेता येणार असून, शिबिरात हृदयरोग, किडनीचे आजार, मेंदू विकार, कॅन्सर, गर्भाशय, बालरोग आदि आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)