सात मुस्लीम जोडप्यांचा सामूहिक विवाह

By Admin | Updated: February 26, 2017 20:15 IST2017-02-26T20:15:46+5:302017-02-26T20:15:46+5:30

मुस्लीम समाजात सामूहिक विवाहाची संकल्पना रुजविणाऱ्या उडान एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह

Mass marriages of seven Muslim couples | सात मुस्लीम जोडप्यांचा सामूहिक विवाह

सात मुस्लीम जोडप्यांचा सामूहिक विवाह



नाशिक :
मुस्लीम समाजात सामूहिक विवाहाची संकल्पना रुजविणाऱ्या उडान एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्यात सात जोडप्यांचे लग्न पारंपरिक पद्धतीने लावण्यात आले. वडाळारोडवरील मिरजकर मैदानात आयोजित विवाह समारंभाप्रसंगी समाजातील विविध मान्यवर वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यामध्ये मौलाना वासिक रजा यांनी ‘निकाह’चा विधी पार पाडला. खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी यांनी दुआ करत वधू-वरांचे भावी वैवाहिक आयुष्य सुखा- समाधानाचे जावो, ही सदिच्छा व्यक्त केली.
समाजातील गरजू घटकांमधील मुला-मुलींचे विवाह जमवून ते थाटामाटात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पाडणे हा एकमेव उद्देश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष फजल शेख यांनी यावेळी दिली. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील नववधू-वरांना संस्थेच्या वतीने एकसमान संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व जोडप्यांबरोबर आलेल्या पाहुण्यांसाठी संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्याप्रसंगी समाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mass marriages of seven Muslim couples