पेठ तालुक्यात झेंडू फुलांची तोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 19:06 IST2018-11-05T19:06:24+5:302018-11-05T19:06:42+5:30
देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून, खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या असताना बळीराजा मात्र लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गाठण्यासाठी झेंडूच्या फुलांची तोडणी करण्यात गर्कआहे.

पेठ तालुक्यात झेंडू फुलांची तोडणी
पेठ : देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून, खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या असताना बळीराजा मात्र लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गाठण्यासाठी झेंडूच्या फुलांची तोडणी करण्यात गर्कआहे.
लक्ष्मीपूजनाला फुलांची मागणी वाढलेली असते. त्यासाठी दोन दिवस आधीच शेतकरी फुले तोडून घाऊक बाजारपेठेत दाखल करत असतात. एकीकडे घराघरात महिलांची दिवाळी फराळाची लगबग सुरू असताना ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी महिला मात्र शेतात राबताना दिसून येत आहेत. सध्या शाळांनाही सुट्या असल्याने घरातील आबालवृद्ध फुले तोडण्याच्या कामात मदत करत आहेत. शेतातील फुले तोडून क्रेट भरून गुजरात राज्यात विक्र ीसाठी पाठवले जात आहेत. किमान लक्ष्मीपूजन व दिवाळीचा मुहूर्त साधून दोन पैसे पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे.