Marathi Sahitya Sammelan : नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ; गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहिण्याचा मी प्रयत्न करेन- विश्वास पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 20:54 IST2021-12-03T20:54:03+5:302021-12-03T20:54:29+5:30
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.

Marathi Sahitya Sammelan : नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ; गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहिण्याचा मी प्रयत्न करेन- विश्वास पाटील
नाशिक : मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहिण्याचा प्रयत्न करेन, से प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नाॅलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केले. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.
काळाराम मंदिर सत्याग्रह, दादासाहेब गायकवाड यांचे कार्य या नाशिकनगरीत होत. नाशिक या भूमीत अनेक महत्वाचे व्यक्तिमत्व घडले असल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.यारी आणि दिलदारी यात नाशिकचा हात कोणी धरू शकत नाही.राजकीय दृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाची भूमी असून राजकारणातही मैत्री निभावणारे राजकीय व्यक्ती आहे. साहित्याच्या दृष्टिकोनातून रत्नाची खान आहे. नाशिकमध्ये साहित्याची परंपरा अतिशय मोठी आहे.
कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रसाठी, मराठीमाती साठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे शाहीर, अनेक साहित्यिक, लेखक यांनी रस्त्यावर येऊन जो संघर्ष उभा केला होता त्याची आठवण देखील संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी यावेळी मांडली.