Maratha Reservation: 'जातीचा दाखला असलेल्यांनाच आंदोलनाच्या व्यासपीठावर प्रवेश द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 21:11 IST2018-08-09T20:47:52+5:302018-08-09T21:11:44+5:30
Maratha Reservation: गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीग्रह मैदानावर सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्की केली.

Maratha Reservation: 'जातीचा दाखला असलेल्यांनाच आंदोलनाच्या व्यासपीठावर प्रवेश द्या'
नाशिक - गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीग्रह मैदानावर सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्की केली. तसेच याठिकाणी सात ते आठ गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. त्यानंतर या आंदोलनात सहभागी झालेले युवक हे मराठा समाजाचे नसल्याचे सुतोवाच माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
क्रांती दिनाचे औचित्य साधून आज मराठा समाजाने मोठे आंदोलन पुकारले होते. तसेच मुंबई वगळता राज्यात सर्वच बहुतांश जिल्ह्यात बंदही पाळण्यात आले होता. या बंदवेळी नाशिक जिल्ह्याच्या गंगापूर येथीह सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी बंद पुकारत घोषणाबाजी केली. यावेळी काही ठिकाणी तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. तर सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी आंदोलकांत काही परकेच घुसल्याचे म्हटले. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जातीचा दाखला असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल, वा देण्यात यावा असे सूतोवाचही माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. अर्थात, मराठा आंदोलकनात घुसून काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक जाळपोळ करण्यात येत असून त्यामुळे मराठा समाज बदनाम होत आहे, हा सांगण्याचा त्यांचा या मागील हेतू होता.