मनमाडला कांद्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 00:59 IST2022-03-02T00:58:11+5:302022-03-02T00:59:00+5:30
मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठी आवक झाली. लाल आणि सफेद कांद्याच्या भावात सतत चढ - उतार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भावात घसरण होत आहे.

मनमाडला कांद्याच्या दरात घसरण
मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठी आवक झाली. लाल आणि सफेद कांद्याच्या भावात सतत चढ - उतार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भावात घसरण होत आहे.
गेल्या काही आठवड्यात बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव स्थिर होते. शनिवारी लाल कांद्याला २१०० रुपये तर सफेद कांद्याला १०३० रुपये क्विंटल असे भाव होते. सोमवारी भावात मोठी घसरण झाली. लाल कांद्याला ३०० ते २०३६, सरासरी १८५० रुपये क्विंटल, तर सफेद कांद्याला ६०० ते १०५०, सरासरी ७८० रुपये क्विंटल असे भाव होते. मंगळवारी बाजार आवारात ५८३ ट्रॅक्टर इतकी कांद्याची प्रचंड आवक झाली. लाल कांद्याला ३०० ते २०६०, सरासरी १९०० रुपये क्विंटल, तर सफेद कांद्याला ५८० ते ९७० व सरासरी ७९० रुपये प्रतिक्विंटल असे भाव होते.