शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड : नवरात्रोत्सवात वीजपुरवठा खंडित;

By admin | Updated: September 28, 2014 23:32 IST

अधिकाऱ्यांचा ‘दांडिया’संतप्त ‘दुर्गांचा’ धडक मोर्चा

मनमाड : नवरात्रोत्सवात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या दुर्गांनी रात्री थेट वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. बराच वेळ सुरू असलेल्या या आंदोलनानंतरही कुणीही जबाबदार अधिकारी उपस्थित न झाल्याने अधिकाऱ्यांच्या या ‘दांडिया’मुळे आंदोलक महिलांचा संताप अनावर झाला.सण समारंभ काळात रात्रीचे भारनियमन करू नये अशा सूचना असतानाही गणेशत्सवाप्रमाणेच नवरात्रातही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्याची आपली परंपरा वितरणने जोपसली. आज रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नवरात्र उत्सवावर काळोखाचे सावट पसरले. यामुळे दांडिया खेळाला सुद्धा अडथळा निर्माण झाला. बराच वेळ वाट पाहून ही विज पुरवठा सुरू न झाल्याने अखेर गांधी चौकातील संतप्त महिलांनी थेट विज वितरणच्या एफसीआय रोड वरील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी निषेधाच्या घोेषणा देण्यात आल्या.बराच वेळ आंदोलन करून ही कुणीही जबाबदार अधिकारी उपस्थित न झाल्याने महिलांच्या संतापाचा पारा अनावर झाला. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गवळी यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढली. वीज वितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)