मांजरपाडा प्रकल्प आता देवसाने नावाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:39 IST2018-10-06T00:39:24+5:302018-10-06T00:39:32+5:30
बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मांजरपाडा प्रकल्प आता देवसाने नावाने
दिंडोरी : बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मांजरपाडा प्रकल्प हा देवसाने येथे होत असून, सर्वाधिक जमीन देवसाने येथील गेली आहे. केवळ पार नदीचा उगम मांजरपाडा येथे होतो म्हणून या प्रकल्पाला मांजरपाडा नाव दिले गेले. मात्र प्रत्यक्ष प्रकल्प येथून बारा किलोमीटर दूर देवसाने येथे झालेला आहे. सदर प्रकल्पाला मांजरपाडा प्रकल्प नाव दिल्यापासून स्थानिक प्रकल्पग्रस शेतकरी यांनी त्याला देवसाने नाव देण्याची मागणी केली होती. आमदार नरहरी झिरवाळ यांनी याबाबत सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर शासनाने या प्रकल्पाच्या नामांतरणास मंजुरी दिली.
असल्याची माहिती आमदार झिरवाळ यांनी दिली आहे. या निर्णयाचे देवसाने व परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. आता हा प्रकल्प देवसाने प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे.