भारतीय बेसबॉल संघात मालेगावच्या मंजुषा पगारची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 04:53 PM2019-10-11T16:53:41+5:302019-10-11T16:54:04+5:30

मालेगाव : चीनमधील झोनगशन येथे ९ ते १५ नोव्हेम्बरदरम्यान होणाऱ्या दुसºया आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मालेगावच्या मंजुषा पगार हिची निवड झाली.

Malegaon's selection of salary for Indian baseball team | भारतीय बेसबॉल संघात मालेगावच्या मंजुषा पगारची निवड

भारतीय बेसबॉल संघात मालेगावच्या मंजुषा पगारची निवड

googlenewsNext

मालेगाव : चीनमधील झोनगशन येथे ९ ते १५ नोव्हेम्बरदरम्यान होणाऱ्या दुसºया आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात मालेगावच्या मंजुषा पगार हिची निवड झाली. भारतीय संघात निवड होणारी मंजुषा पगार ही मालेगावची पहिली खेळाडू ठरली आहे. २७ ते २९ आॅगस्ट २०१९ दरम्यान पाहिले सराव शिबीर नाकोडा, हरियाणा येथे झाले. त्या शिबिरात ५० खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून ३० खेळाडूंची दुसºया सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. सराव शिबीर २६ सप्टेंबर ते ८ आॅक्टोम्बर दरम्यान लव्हली विद्यापीठ चंदीगड येथे झाला. त्या सराव शिबारातून अंतिम १८ खेळाडूंची निवड करण्यात आली. मंजुषा पगार ही आता भारतीय बेसबॉल संघाचे नेतृत्व करणार आहे. अंतिम १८ खेळाडूंचे सराव शिबीर २४ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान चंदिगड येथे होणार असून संघ ७ नोव्हेंबरला चीनला रवाना होणार आहे. मंजुषा ही मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी कुटुंबातील असून तिने मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. मंजुषा ही गेली पाच वर्षांपासून प्रशिक्षक डॉ. सुरेखा दप्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून मागील चार वर्षांपासून ती महाराष्ट्र बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहे. तिच्या या कामगिरीची भारतीय बेसबॉल संघटनेने दखल घेऊन तिची भारतीय संघात निवड केली.

Web Title: Malegaon's selection of salary for Indian baseball team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक