मालेगावी गोळीबार; तिघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST2020-12-05T04:23:57+5:302020-12-05T04:23:57+5:30

शहरातील रौशनाबाद येथे शुक्रवारी सायंकाळी रिक्षाचा कट लागल्याने रिक्षाचालकासह महिला प्रवाशांना शिविगाळ करत असल्याच्या कारणावरून मध्यस्थी करण्याचा कारणावरून भांडण ...

Malegaon shooting; Three suspects in custody | मालेगावी गोळीबार; तिघे संशयित ताब्यात

मालेगावी गोळीबार; तिघे संशयित ताब्यात

शहरातील रौशनाबाद येथे शुक्रवारी सायंकाळी रिक्षाचा कट लागल्याने रिक्षाचालकासह महिला प्रवाशांना शिविगाळ करत असल्याच्या कारणावरून मध्यस्थी करण्याचा कारणावरून भांडण झाले. थोड्याच वेळात काही तरुणांनी पासूनगर येथे येऊन मोहम्मद आमीर मोहम्मद सिद्दिक (२५) रा.रौशनाबाद याचे दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेचे चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांना एक काडतूसची रिकामी नळी, तलवारसदृश वस्तू जप्त केली. पोलिसांनी अवघ्या तासाभरात तीन जणांना ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

इन्फो

संशयिताना तासाभरात अटक

किरकोळ कारणावरून झालेल्या गोळीबाराची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले व त्वरित कारवाईच्या सूचना दिल्या. त्यामुळे पोलिसांनी अवघ्या तासाभरात काही जणांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे.

Web Title: Malegaon shooting; Three suspects in custody