शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : एलबीटीत घट; नवीन वर्षात उत्पन्नवाढीचे आवाहन

By admin | Updated: January 1, 2015 00:32 IST

मनपा आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

 मालेगाव- जवळपास ४०० कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या येथील महानगरपालिकेच्या एकूण आर्थिक उत्पन्नात गेल्या वर्षी कमालीची घट झालेली आहे. जकातीला पर्याय असणाऱ्या व मनपा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग असणाऱ्या एलबीटी वसुलीत २० कोटी रुपयांची घट झाली आहे. उत्पन्नाचा दुसरा स्रोत असलेली पारगमन शुल्क वसुली येत्या काही दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. तसेच गृहकर वसुुली गेल्या काही वर्षात ४० टक्क्याच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासन व राज्य शासनातर्फे तातडीने काही उपाययोजना अमलात न आणल्यास नवीन वर्ष मालेगाव मनपासाठी आर्थिक संकटमय ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
स्थानिक संस्था कर (एलबीटी), पारगमन शुल्क (एस्कॉर्ट) व गृहकर वसुली हे मालेगाव मनपाचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने मनपा हद्दीत जकातऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावेळी मालेगावी एलबीटी वसुली कितपत यशस्वी होईल, अशी आशंका व्यक्त केली जात होती. मात्र त्यावेळी मालेगावातील सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने व तत्कालीन मनपा एलबीटी विभागप्रमुख राजू खैरनार यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या आठ कर्मचाऱ्यांनी ८७ टक्के एलबीटीची वसुलीची कामगिरी बजावली. हा राज्यातील एलबीटी वसुलीचा उच्चांक होता. या कामगिरीने उत्साहित झालेले मनपा प्रशासन एप्रिल २०१४पासून दुसऱ्या वर्षीच्या वसुलीसाठी उत्साहाने कामाला लागले. मात्र यादरम्यान झालेल्या लोकसभा व पाठोपाठच्या विधानसभा निवडणुकांनी एलबीटी वसुलीचे गणितच बदलून टाकले. दोन्ही निवडणुकांदरम्यान बहुतेक सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात व जाहीर सभांमधून एलबीटी हटावचे समर्थन केले. महिना - दोन महिन्यात एलबीटी बंद होईल या आशेने येथील व्यापारीवर्गाने एलबीटीकडे पाठ फिरवली. त्याचा विपरीत परिणाम मनपाच्या एलबीटी वसुलीवर झाला.
चालूवर्षी मनपाने ८१ कोटी रुपये एलबीटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार गेल्या आठ महिन्यात ५४ कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मासिक सव्वाचार कोटी रुपये प्रमाणे अवघे ३६ कोटी रुपये वसूल झालेले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत मनपाच्या एलबीटी वसुलीत तब्बल १८ कोटी रुपयांची घट झालेली आहे.
दुसरीकडे मालेगाव मनपाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून पारगमन शुल्क वसुलीकडे बघितले जाते. चालू वर्षी मनपास जवळपास ४६ कोटी रुपये पारगमन शुल्क वसुली अपेक्षित आहे. मात्र राज्यभरात या पारगमन शुल्क वसुलीस वाहनधारक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचा विरोध आहे. या विरोधातून नुकतीच धुळे व भिवंडी मनपाने पारगमन शुल्क वसुली बंद केली आहे. सध्या राज्यात केवळ मालेगाव व सोलापूर मनपा हद्दीतच पारगमन शुुल्क वसुली केली जात आहे. यापूर्वी काही जणांनी या वसुलीविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. आता नवीन राज्य व केंद्र सरकारनेच याप्रश्नी ठोस निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनास तब्बल ४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नास मुकावे लागणार आहे. गृहकर वसुली हे मनपाचे उत्पन्नाचे तिसरे प्रमुख साधन आहे. मात्र कर्मचाऱ्यांची विविध कामे, नागरिकांचा अनुत्साह यामुळे मनपाची गृहकर व पाणीपट्टी वसुली अवघ्या तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास फिरत आहे. चालूवर्षी एकूण ३२ कोटी रुपये गृहकर वसुलीचे उद्दिष्ट आहे. ती नेमकी किती वसूल होते हे येत्या मार्चमध्येच समजणार आहे.