शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ऐन सणासुदीत ‘अंधार’

By admin | Updated: September 30, 2014 21:49 IST

नागरीक संतप्त : दिवसभरात आठ तास विज पुरवठा खंडीत

मालेगाव कॅम्प : शहर व परिसरात ऐन सणासुदीच्या कालावधीत भारनियमन सुरू असल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दिवसभरात सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात कामकाज ठप्प झाले आहे. किमान दसरा-दिवाळीत तरी वीज भारनियमन रद्द करावे, अशी मागणी होत आहे.शहरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून वीजपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अखंडित वीजपुरवठा मिळवण्यासाठी शहरातील जनतेसह राजकीय पुढाऱ्यांनी जंग पछाडले होते. यात सर्वप्रथम शहरातील संपूर्ण भारनियमन रद्द करा, सुधारित भारनियमन करा, शहरात एकाच वेळेस सर्वत्र भारनियमन करा, यंत्रमागासाठी एक्स्प्रेस वाहिनी करून वीजपुरवठा द्या अशा विविध मागण्या लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. तसेच रमजान ईद, गणपती उत्सव, नवरात्री, दसरा आदि सणांमध्ये भारनियमन पूर्ण बंद करण्यात यावे, अशीदेखील मागणी केली होती; परंतु त्या सर्व मागण्यांना सध्या वीज कंपनीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. रमजान, गणपती उत्सव कालावधीत काही काळ अखंडित वीजपुरवठा सुरू होता; परंतु सध्या नवरात्रीचा कालावधी सुरू आहे. यात वीज कंपनीने पहिल्या माळेपासून भारनियमन सुरू केले आहे. पहाटे चार व दुपारी चार तास अशा दोन सत्रात बिनबोभाट भारनियमन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने भारनियमन समस्येकडे आंदोलकांचेही दुर्लक्ष झाले आहे.सणासुदीच्या काळात भारनियमन होणार नाही असे वीज कंपनीने आश्वासन दिले असले तरी भारनियमन कडेकोटपणे सुरू झाले. त्यामुळे नवरात्री व इतर महत्त्वाच्या कामांवर विरजन पडले आहे. सायंकाळ व रात्री ९ वाजेपर्यंत शहरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सणांच्या आनंदावर शहरवासीयांचा हिरमोड होत आहे. या भारनियमनाच्या समस्यावर आचारसंहिताच्या बडगा विसरून लोकप्रतिनिधींनी वीज कंपनीशी भारनियमन रद्द करण्याबाबत चर्चा करून भारनियमन रद्द करण्याची मागणी करावी, अशा भावना शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. (वार्ताहर)