आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी

By अझहर शेख | Published: December 16, 2019 05:17 PM2019-12-16T17:17:39+5:302019-12-16T17:28:16+5:30

‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज आहे, असेही मुखर्जी

Make self-defense lessons compulsory in every school: Rani Mukherjee | आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी

आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी

Next
ठळक मुद्देजो पुरुष प्रत्येक नारीचा सन्मान, आदर करतो तोच खरा मर्द महिला, मुलींवर अत्याचार करणाऱ्याला समाजाने धडा शिकवावा,

नाशिक : देशातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे देणे अनिवार्य क रायला हवे, अशी मागणी अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी केली. शाळा, महाविद्यालयांत आत्संरक्षणाचे धडे मुलींना दिले गेले तर मुली स्वत:चे रक्षण करण्यास अधिक सक्षम होईल. काही पुरूषांच्या विकृतपणामुळे भारतातील पुरूषार्थला डाग लागत अशी खंतही राणीने बोलून दाखविली. जो पुरुष प्रत्येक नारीचा सन्मान, आदर करतो तोच खरा मर्द समजावा. महिला, मुलींना एकटे गाठून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्याला समाजाने धडा शिकवावा, असे रोख ठोक मत राणीने तीच्या खास स्टाईलमध्ये व्यक्त केले.

तरडे यांनी ‘मर्दानी-२’मधून समाजाला दिलेल्या संदेशाबाबत काय सांगाल? असा प्रश्न विचारताच मुखर्जी यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले, संदेश तर ज्यांना द्यायचा आहे त्यांच्यापर्यंत चांगलाच पोहचला आहे. मात्र संपूर्ण समाजाला यामधून महिलांचा आदर, सन्मानाचा संदेश दिला आहे. त्यानंतर त्यांनी पुढे बोलताना सांगितले, ‘निर्भया’ घटनेनंतर देश घाबरला व हादरलासुद्धा. या घटनेपासून देशाने धडा घेतला, मात्र दुर्दैवाने अशा घटना अलीकडील हैदराबाद, उन्नाव, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरातही घडल्या. त्यामुळे महिलांनी आपल्यामधील लुप्त असलेली आंतर्मनातील खरी शक्ती ओळखणे काळाची गरज आहे, असेही मुखर्जी यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या निर्भया पथक मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रमुख शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, उद्योजक, प्रतिष्ठित संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांगरे पाटील यांनी आयुक्तालयाकडून राबविल्या जात असलेल्या महिला सुरक्षा व जनजागृतीपर उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच राज्यात महिला हिंसाचार, अत्याचाराच्या घटनांचा आलेख प्रास्ताविकातून मांडला. सूत्रसंचालन शिल्पा भोंडे यांनी केले, तर आभार उपआयुक्त अमोल तांबे यांनी मानले.

‘स्त्री’ला देव्हा-यात बसवू नका : मुक्ता बर्वे
आई देवसमान जरूर आहे; मात्र देव नाही. स्त्रीला देवा-यात बसवू नका तर तिला दैनंदिन जीवनात तिचे हक्क मिळवून द्या, असे मत मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने व्यक्त केले. स्त्री दिसायला नक्कीच सुंदर असते, त्याचा अर्थ तिला बंदिस्त करून ठेवणे असा होत नाही. स्त्रीलादेखील पुरूषांप्रमाणेच समान हक्क, अधिकार देण्यात आले आहे. समाजाने स्त्रीविषयक आपली मानसिकता बदलायची वेळ आली आहे. एखाद्या भावनेची वासना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय व्हायला हवे. समाजाने त्यासाठी भावना ऐकूण घेणारे व्हावे, जेणेकरून विचारांचे व्याभीचारात रूपांतर होणार नाही.

Web Title: Make self-defense lessons compulsory in every school: Rani Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.