शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव जमीन प्रकरणात एसीबीला मोठा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:45 IST

सन २०१५ मध्ये नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपल्या अखत्यारित परवानगी दिली होती. मुळात हे अधिकार विभागीय आयुक्तांचे असताना त्याचा दुरुपयोग तहसीलदारांनी केला व या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासकीय नजराणा बुडविण्यात

ठळक मुद्देजमीन खरेदीदारांना परत : महसूल खात्याचा निर्णय

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाचे सुमारे पावणे तीन कोटी रुपयांचे नुकसान करण्याबरोबरच शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांसह जमीन मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करणा-या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला मोठा झटका बसला असून, या प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन अपर जिल्हाधिका-यांनी सदर जमिनींवर मूळ खरेदीदारांची नावे लावण्याचे आदेश दिले आहेत. सरकार जमा झालेल्या या जमिनी मालकांच्या नावावर झाल्याचा निर्वाळा खुद्द महसूल विभागानेच दिल्यामुळे एसीबीने दाखल गुन्ह्याला काहीच अर्थ शिल्लक राहिलेला नाही.सन २०१५ मध्ये नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपल्या अखत्यारित परवानगी दिली होती. मुळात हे अधिकार विभागीय आयुक्तांचे असताना त्याचा दुरुपयोग तहसीलदारांनी केला व या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासकीय नजराणा बुडविण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यावर जिल्हाधिकाºयांनी त्याची चौकशी सुरू केली होती. मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी या प्रकरणी चौकशी करून सदर जमिनी शासन जमा करण्याचे आदेश काढले होते. एवढ्यापुरता मर्यादित व संपूर्ण महसूल खात्याच्या अखत्यारित व अर्धन्यायिक बाब असलेल्या या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हस्तक्षेप करून एका व्यक्तीच्या तक्रारीवरून नांदगावचे तहसीलदार, प्रांत, मंडळ अधिकारी, तलाठ्यांसह जमीन खरेदी-विक्री करणारे शेतकरी अशा २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यात शासनाचे पावणे तीन कोटी रुपयांचे नुकसान केले तसेच सदर रकमेचा संगनमताने अपहार केल्याचा आरोप केला आहे. एकाच वेळी महसूल अधिकाºयांवर इतक्या मोठ्या प्रमाणात एसीबीने गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याने मोठी खळबळ उडाली होती. अर्धन्यायिक बाबीत एसीबीने केलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने आंदोलनही छेडले होते. दरम्यान, यातील सर्व संशयित आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.नवीन शर्तीच्या जमिनींची खरेदी-विक्री करणाºया मालकांनी याबाबत विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली असता, त्याची सुनावणी होऊन जमीन शासन जमा करण्याचा तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पवार यांचा आदेश रद्द करण्यात येऊन विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची फेर सुनावणी घेण्याचे आदेश मालेगावच्याच दुसºया अपर जिल्हाधिकाºयांना सोपविले होते. गेल्या आठवड्यात त्याची सुनावणी पूर्ण होऊन नवीन शर्तींच्या जमिनींचा व्यवहार कायदेशीर ठरवून त्या मूळ मालकांच्या नावे करण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनNashikनाशिक