शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

कायझन पुरस्काराचा ‘महिंद्रा’ मानकरी

By admin | Updated: January 24, 2016 23:05 IST

राज्यस्तरीय स्पर्धा : राज्यातील अनेक कारखान्यांतील ४२५ स्पर्धकांचा सहभाग

सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय कायझन स्पर्धेत राज्यातील अनेक कारखान्यांतील ४२५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात कायझन एक्सलन्स कन्सिसटन्सी अवॉर्डचा मानकरी नाशिकचा महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कारखाना ठरला आहे. अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा समितीचे अध्यक्ष अनिल जंगले यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. या स्पर्धेत पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली आदिंसह राज्यातील विविध कारखान्यातील १०३ संघ म्हणजेच ४२५ कर्मचारी सहभागी झाले होते. कारखान्यात काम करताना उपाय योजना केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना सादर करण्यात आल्या. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नरेंद्र कोकीळ, सुदीप नायर, सागर विसे, अशोक रत्नपारखी, मिलिंद गुणे, सचिन भालेराव, संजय सराफ, चारुदत्त बगदे, मनोज दिगळूरकर, पी. के. जोशी, दिनेश खिस्ती आदिंनी काम पाहिले. ही स्पर्धा मोठे उद्योग घटक आणि लघु व मध्यम उद्योग घटक या दोन गटात घेण्यात आली. बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे जिंदाल कंपनीचे अध्यक्ष दिनेश सिन्हा, सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक, अनिल जंगले, अजय विद्याभानू आदि उपस्थित होते. (वार्ताहर)