शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रिकर्व्हमध्ये महाराष्ट्राचे पाच सुवर्णवेध

By admin | Updated: May 23, 2014 01:06 IST

शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : महाराष्ट्र संघाचे निर्विवाद वर्चस्व

शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : महाराष्ट्र संघाचे निर्विवाद वर्चस्वनाशिक : येथे सुरू असलेल्या ५९ व्या शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी रिकर्व्ह (फिटा) प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी निर्विवाद लक्ष्य साधताना अमरावतीच्या प्रवीण जाधव याने दोन, पूर्वा पल्लीवाल हिने दोन, तर तन्मय मालुसरे याने एक अशा पाच सुवर्णपदकांसह आठ पदके पटकावली. पूर्वाचे तिसरे सुवर्णपदक अवघ्या आठ गुणांनी हुकले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे १९ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा सुरू असून, आज स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्राने वर्चस्व राखले. स्पर्धेमध्ये आज मुला-मुलींच्या रिकर्व्ह (फिटा) प्रकारातील ७० मीटर, ६० मीटर आणि ५० मीटरच्या स्पर्धा रंगल्या. यामध्ये आज महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी सहा गटांतून पाच सुवर्णपदकांची कमाई केली. मुलांच्या गटातून अमरावतीच्या प्रवीण जाधव याने ७० मीटर व ६० मीटर गटामध्ये सुवर्णवेध साधला, तर ५० मीटरमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तन्मय मालुसरे याने ५० मीटर सुवर्ण, तर ७० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले. ५० मीटरमध्ये महाराष्ट्राला दोन पदके मिळाली. मुलांच्या गटातून महाराष्ट्राला तीन सुवर्णपदकांसह पाच पदके प्राप्त झाली. मुलींच्या गटातही अमरावतीच्या पूर्वा पल्लीवाल हिने ७० मीटर आणि ६० मीटर अंतराच्या गटात सुवर्णवेध साधला; परंतु हीच कामगिरी ५० मीटरमध्ये करण्यात तिला अपयश आले आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पूर्वाशिवाय संघातील इतरांना पदकांचा निशाणा मात्र चुकला. त्यामुळे मुलींच्या गटात फक्त पूर्वाच्या रूपाने महाराष्ट्राला दोन सुवर्णासह तीन पदके मिळाली. आज झालेल्या स्पर्धेतील खेळाडूंना नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या अध्यक्ष नीलिमा पवार, राष्ट्रीय खेळाडू स्नेहल विधाते, अतुल सिंग, प्रमोद चांदुरकर, क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. उद्या स्पर्धेचा समारोप असून, मुलांच्या इंडियन राऊंड प्रकाराच्या स्पर्धा होतील. निकाल :मुली : ७० मीटर प्रकार : पूर्वा पल्लीवाल (महाराष्ट्र - सुवर्ण), हेमलता (दिल्ली - रौप्य), रिना कुमारी (झारखंड - कांस्य).६० मीटर प्रकार : पूर्वा पल्लीवाल (महाराष्ट्र - सुवर्ण), रिना कुमार (झारखंड - रौप्य), शालिनी पाठक (झारखंड - कांस्य).५० मीटर : रिना कुमारी (झारखंड - सुवर्ण), हेमलता (दिल्ली - रौप्य), पूर्वा पल्लीवाल (महाराष्ट्र - कांस्य).मुले : ७० मीटर प्रकार : प्रवीण जाधव (महाराष्ट्र - सुवर्ण), आशिष चौधरी (सीबीएसई - रौप्य), तन्मय मालुसरे (महाराष्ट्र - कांस्य).६० मीटर प्रकार : प्रवीण जाधव (महाराष्ट्र - सुवर्ण), अमित (दिल्ली - रौप्य), नितीश (दिल्ली - कांस्य).५० मीटर प्रकार : तन्मय मालुसरे (महाराष्ट्र - सुवर्ण), कमल सागर (दिल्ली - रौप्य), प्रवीण जाधव (महाराष्ट्र - कांस्य).