शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:10 IST

गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही.

धनंजय वाखारेनाशिक - जिल्ह्यातील येवला मतदारसंघात सलग चौथ्यांदा उमेदवारी करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर पुन्हा एकदा शिवसेनेचे संभाजी पवार यांचे आव्हान आहे. निवडणूक रिंगणात एकूण ८ उमेदवार असले तरी खरी लढत भुजबळ-पवार यांच्यातच रंगणार आहे.

भुजबळ यांनी आपल्या कामाच्या झपाट्याने गेल्या १५ वर्षांत मतदारसंघावर मांड घट्ट केलेली असल्याने यंदाही त्यांची नौका विधानभवनाच्या किनाऱ्याला लागेल, असे चित्र दिसत असले तरी, अधून-मधून डोकावणारे विरोधाचे खडक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळेच गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही.

येवला नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर सेनेचे वर्चस्व असले तरी आत्मकेंद्रित राजकारणामुळे युतीतील नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. शिवाय, ईडीमुळे तुंरुगवास भोगावा लागल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ समर्थकांकडून होत आहे. सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली, असा त्यांचा आरोप आहे.जमेच्या बाजू

छगन भुजबळ - सलग तीन टर्म नेतृत्व करताना छगन भुजबळ यांनी मतदारसंघाला विकासाची दाखविलेली दिशा. नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात पुणेगाव-दरसवाडी योजनेद्वारे पाणी कातरणी परिसरापर्यंत आणून ठेवल्याने सुमारे ४० खेड्यांना मिळालेला दिलासा. पैठणी क्लस्टर, तात्या टोपे स्मारक, मुक्तिभूमी स्मारक यापासून ते क्रीडासंकुलापर्यंत निर्माण केलेली स्थायी स्वरूपाची कामे.

संभाजी पवार - मागील निवडणुकीतही शिवसेनेकडून उमेदवारी करताना दुसऱ्या क्रमांकाची सुमारे ३४ टक्के घेतलेली मते. संघटन कौशल्यामुळे कार्यकर्त्यांचे आवतीभवती असणारे मोहोळ. पंचायत समिती, मजूर फेडरेशन आणि स्वत:च्या शैक्षणिक संस्थेचे जिल्हाभर पसरलेले जाळे यामुळे जनमानसाला परिचित असलेला चेहरा. चुलते माजी आमदार मारोतराव पवार यांचा लाभलेला राजकीय वारसा. विविध कामांसाठी वैयक्तिक पुढाकार.उणे बाजू

छगन भुजबळ - आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी कार्यरत असताना दाखविलेली विकासाची गती गेल्या पाच वर्षांत मंदावली. त्यामुळे काही प्रमाणात नाराजीचा सूर. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात २६ महिने तुरुंगवारीमुळे जनमानसात निर्माण झालेले संशयाचे मळभ. गेल्या पाच वर्षांत कमी झालेला लोकसंपर्क. जवळचे म्हणविले जाणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा. निवडणूकपूर्व पक्षांतराच्या चर्चांमुळे पक्षनिष्ठेबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेला संशयकल्लोळ.

संभाजी पवार - प्रभावी कार्यकर्ता म्हणून ओळख असली तरी वक्तृत्वशैलीचा अभाव. मागील निवडणुकीत पराभूत होऊनही यंदा पुन्हा शिवसेनेने उमेदवारी पदरात टाकल्याने पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये उमटलेला नाराजीचा सूर. या सुप्त विरोधामुळे त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता. शिवसेनेच्याच स्थानिक दोघा (विधान परिषदेतील) आमदारांचे कितपत सहकार्य मिळेल याबाबत साशंकता. भुजबळांबाबत ज्येष्ठ शिवसैनिकांमध्येही असलेली सहानुभूती.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chhagan Bhujbalछगन भुजबळ