त्र्यंबकचे महंत लोणारकर यांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:18 IST2018-12-17T01:18:40+5:302018-12-17T01:18:58+5:30
मुंबई - आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेले त्र्यंबकेश्वरचे महंत सामराज बाबा लोणारकर (७७, रा़ पंगळवाडी, त्र्यंबकेश्वर) यांचे शनिवारी (दि़१५) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले़

त्र्यंबकचे महंत लोणारकर यांचा अपघातात मृत्यू
नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेले त्र्यंबकेश्वरचे महंत सामराज बाबा लोणारकर (७७, रा़ पंगळवाडी, त्र्यंबकेश्वर) यांचे शनिवारी (दि़१५) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले़
लोणारकर महाराज हे मंगळवारी (दि़११) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुंबई - आग्रा महामार्गावरील प्रेमदान समोरून दुचाकीवरून (एमएच १५, डीवाय ३७६६) जात होते़ यावेळी त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते़ शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी बाळू नेरकर यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़