शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी फिटिंग्ज लावण्यास स्थायीचाच खो

By admin | Updated: September 26, 2014 00:56 IST

एलईडी फिटिंग्ज लावण्यास स्थायीचाच खो

नाशिक : निविदा काढण्यापासूनच वादग्रस्त असलेल्या एलईडी दिव्यांच्या सुमारे साडेसतराशे फिटिंग्ज अखेरीस शहरात दाखल झाल्या आहेत. तथापि, स्थायी समितीने या विलंबाबद्दल कायदेशीर कारवाईसाठी चाचपणी सुरू केली आणि त्यामुळे फिटिंग्ज बसविण्याचे काम रोखल्याने या फिटिंग्ज अक्षरश: पडून आहेत. आता विधानसभा निवडणुकीनंतरच एलईडीचा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.गेल्या तीन वर्षांपासून एलईडी दिवे बसविण्याच्या ठेक्यातील घोळ गाजत आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर वीजबचत होणार असून, या बचतीच्या रकमेतून ठेकेदाराला गुंतवणूक केलेली रक्कम देण्याचा ठराव करण्यात आला होता; मात्र प्रशासनाने त्यात घोळ घालून डिफर्ड पेमेंट म्हणजेच प्रलंबित देयक योजनेचे स्वरूप दिले. त्यामुळे १३२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीस आठ वर्षांत २०२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सदर कंपनीशी करार केल्यानंतर त्यांनी वेळेत फिटिंग्ज न पाठविल्याने शहराच्या अनेक भागात अंधाराचे साम्राज्य असून, त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या दोनशे फिटिंग्ज कंपनी पाठविल्या त्यावरही समितीने संताप व्यक्त केला आणि ठेका रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार कारवाई झालेली नाही. तथापि, ठेकेदाराने पालिकेकडे साडेसतराशे फिटिंग्ज पाठविल्या आहेत. संबंधित कंपनीला शहरातील तब्बल ७० हजार फिटिंग्ज बदलायच्या असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ साडेसतराशे फिटिंग्ज पाठविण्यात आल्याने संपूर्ण शहरातील फिटिंग्ज केव्हा बदलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)