शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

नाशिककरांनी लुटले ‘सोने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:37 AM

आदिशक्तीचा जागर करीत नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला देवीमातेच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देत सोने म्हणजे आपट्याची पाने भेट देऊन दसरा सण साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देसीमोल्लंघन : मिरवणूक, महाप्रसाद, आपट्याच्या सोन्याची लयलूट

नाशिक : आदिशक्तीचा जागर करीत नऊ दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला देवीमातेच्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सायंकाळी एकमेकांना शुभेच्छा देत सोने म्हणजे आपट्याची पाने भेट देऊन दसरा सण साजरा करण्यात आला.नवरात्रीच्या नऊ दिवस शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नवदुर्गांच्या पूजनादरम्यान रंगलेल्या दांडिया आणि गरबा महोत्सवाच्या सांगतेबरोबरच विजयादशमीच्या दिवशी नाशिककरांनी घटांचे विसर्जन करीत सीमोल्लंघन केले. गेल्या नऊ दिवसांत शहरातील ग्रामदेवता कालिका देवी उत्सवासोबतच सांडव्यावरची देवी, भद्रकाली देवीची भक्तिभावाने पूजा केली. सिडको, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड परिसरातही नवरात्रोत्सवात तरुणाईचा आनंद शिगेला पोहोचला होता. या आनंदोत्सवाचा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाने गुरुवारी समारोप झाला. शहराचा मध्यवर्ती व सर्वाधिक गर्दीचा भाग असलेला रविवार कारंजा परिसर दसºयाच्या पूर्वसंध्येपासूनच फुले व आपट्याची पाने अर्थात सोने घेऊन आलेल्या विक्रेत्यांनी गजबजला होता. यंदा मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक झाल्याने या भागात पिवळी मखमल अंथरल्याचा भास होतहोता. गुरु वारी सकाळपासून आपट्याच्या पानांचे सोने व फुले खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती.महागाईने होरपळून निघालेल्या बाजारपेठेला गणेशोत्सवापासून काहीसा दिलासा लाभला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरातून संचलन केले. विविध कंपन्यांमध्ये यंत्रसामग्रीचे तर पोलीस आयुक्तालयात शस्त्रपूजन केले गेले. नाशिकरकांनीही घरोघरी शस्त्रपूजन केले. व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांचे वाहनांचे यंत्रसामग्रीचे पूजन केले.फुलांची तोरणे आणि सडा-रांगोळीदारावर लावलेली तोरणे, अंगणातील रांगोळी-सडा आणि एकमेकांना शुभेच्छा देणारे नाशिककर अशा उत्साहपूर्ण वातावरणात दसरा सण उत्साहात साजरा झाला.४नाशिकरोड, रामकुंड व गंगापूररोड परिसरात मावळतीला मोठ्या उत्साहात रावणदहन झाले. त्यातील आकर्षक आतषबाजी पहायला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.४अनेकांच्या मोबाइलवर दिवसभर एसएमएसच्या माध्यमातून शुभेच्छांचा पाऊस पडला.

टॅग्स :NashikनाशिकDasaraदसरा