शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

लोकमत नाशिक महामॅरेथॉन : निरामय आरोग्यासाठी हजारो अबालवृध्दांची धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 10:09 AM

सर्वप्रथम उपस्थित सर्व धावपटूंनी ईदगाह मैदानावर पहाटे साडेपाच वाजेपासूनच वॉमअपला सुरूवात केली. झुम्बा नृत्य करत जमलेल्या स्पर्धकांनी आपली उर्जा वाढविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पावणे सहा वाजेच्या सुमारास सर्वांनी एका तालासुरात राष्‍ट्रगीताचे गायन केले

ठळक मुद्देभल्या पहाटे रंगले तृतीय पर्वचिमुकल्यांपासून वृध्दांपर्यंत सारेच धावले

नाशिक : रविवारची पहाट उजाडली ती राजुरी स्टील प्रस्तुत लोकमतच्या नाशिक महामॅरेथॉनच्या जल्लोषाने. गुलाबी थंडीची मजा लुटत हजारो अबालवृध्द नाशिककरांनी तितक्याच उत्साहात अन् जल्लोषात निरामय आरोग्याचा संदेश आपल्या धावण्यातून दिला. झुंजुमुंजु होताच नाशिककरांनी ठरवून दिलेल्या मार्गावर धाव लगावली.

भल्या पहाटे ईदगाह मैदानावर रंगलेल्या ‘लोकमत नाशिक महामॅरेथॉन’च्या तीसऱ्या पर्वाचा एकच जल्लोष पहावयास मिळाला. धावपटूंचा वॉर्मअप अन् झुम्बाने उर्जा अधिकच संचारली. मॅरेथॉन दौड सुरू होण्यापुर्वी उपस्थित धावपटूंनी राष्‍ट्रगीतांचे एका सुरात गायन केले अन् २१ किलोमीटर अंतरावरील पहिल्या दौडला महापौर सतीश कुलकर्णी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अशोका बिल्डकॉन समुहाचे अध्यक्ष अशोक कटारिया, आंतरराष्‍ट्रीय धावपटू प्रशिक्षक विजेंद्रसिंह, महामॅरेथॉनच्या संकल्पना अंमलात आणणाºया संयोजक रूचिरा दर्डा, आशिष जैन, निवासी संपादक किरण अग्रवाल, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक, पाटील,यांच्यासह विविध मान्यवरांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला.

सर्वप्रथम उपस्थित सर्व धावपटूंनी ईदगाह मैदानावर पहाटे साडेपाच वाजेपासूनच वॉमअपला सुरूवात केली. झुम्बा नृत्य करत जमलेल्या स्पर्धकांनी आपली उर्जा वाढविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पावणे सहा वाजेच्या सुमारास सर्वांनी एका तालासुरात राष्‍ट्रगीताचे गायन केले. आणि २१ किलोमीटर अंतरापर्यंत धाव घेण्यासाठी सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचा जत्था ‘स्टार्ट लाइन’वर सज्ज झाला. सोबत प्रोफेशनल धावपटूंचा ‘पेसर्स’ मार्गदर्शनाला होते. काउण्टडाऊन सुरू झाले अन् स्टार्ट लाइनच्या कमानीवरील घड्याळात ६:१५ वाजताच धावपटूंनी दौड लगावली.त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच १० किलोमीटरपर्यंत धावण्यासाठी भाग घेतलेले स्पर्धक स्टार्टलाइनवर सज्ज झाले. ६:४० वाजेच्या सुमारास त्यांनी निश्चित केलेल्या धावनमार्गावर पळण्यास सुरूवात केली. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतराने ५ कि.मीच्या स्पर्धकांना स्टार्टलाइनवरून ‘ग्रीन सिग्नल’ दाखविला गेला. यानंतर ३ कि.मीपर्यंतच्या अंतरावरील स्पर्धक धावले. जणू अवघे नाशिकच अवघे आज धावण्याच्या दृढ निश्चय घेऊन इदगाह मैदानाकडे झेपावले होते. वैद्यकिय सुविधेची जबाबदारी अपोलो हॉस्पिटलच्या चमूने पार पाडली.या मान्यवरांची लाभली उपस्थितीराजुरी स्टीलचे डिलर मनू चांदवानी, हेमंत कोठावदे, प्रकाश पटेल, एचडीएफसी होम लोन्स लिमिटेडचे व्यवसायवृद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, विपणन प्रमुख समीर दातरंगे, एसएमबीटीचे हर्षल तांबे, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे तांत्रिक संचालक अशोक थरानी, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले, विपणनप्रमुख प्रदीप जोशी, कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक देवेश कारडा, अपोलो हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी मेनन, अपोलोचे डॉ. मंगेश जाधव, सोनी गिफ्ट्सचे संचालक नितीन मुलतानी, साक्षी अ‍ॅडव्हर्टायजिंगचे संचालक सचिन गिते, स्टर्लिंग मोटर्सचे महाव्यवस्थापक महेश राठी, सह्याद्री फार्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितीज अग्रवाल, वरुण अ‍ॅग्रोच्या संचालक मनीषा धात्रक आणि शशीकांत धात्रक, न्यूट्रिकेअरच्या रश्मी सोमाणी, गौरव सोमाणी, मधुर जयदेव गृह उद्योगचे संचालक धर्मेंद तरानी, जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रमुख आणि स्थायीच्या माजी सभापती हिमगौरी आडके, रिलॅक्स झीलचे संजय पाटील, कोटक महिंद्राचे विभागीय व्यवस्थापक अंकित शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.ढोलपथक अन् पोलीस बॅन्डने भरली ऊर्जा!महामॅरेथॉनच्या तीस-या पर्वात सहभागी धावपटूंचा उत्साह शिवताल ग्रुपच्या ढोलपथकाने सळसळता ठेवला. धावपटूंच्या स्टार्टलाईनपुढेच मार्गाच्या दुतर्फा उभे राहून वादकांनी नाशिक ढोलचा ताल धरत धावपटूंमध्ये अधिकच उर्जा भरली. तसेच ईदगाह मैदानावर पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस बॅन्डच्या वादकांनी देशभक्तीपर गीतांची धून वाजवित रंगत आणली. नाशिकचे वाद्य म्हणून ओळख असलेल्या नाशिक ढोलमुळे वातावरणात उत्साह अधिकच संचारला. ढोलचा नाद आसमंतात घुमू लागल्यावर स्पर्धकांमधील जोशात अधिकच भर पडल्याचे दिसून आले. ढोल पथकाच्या वादकांना शहनाईच्या सुरांचीही साथ यंदा लाभली.सकाळी १० पर्यंत वाहतूक एकेरी मार्गाने; वाहतूक पोलीसांचे विशेष परिश्रमलोकमत नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांचा धावण्याचा मार्ग : इदगाह मैदान (गडकरी चौक) ते चांडक सर्कल बाजूने मायको सर्कलपर्यंत रोड दुभाजकाच्या ‘उजव्या बाजू’चा वापर केला. हाच मार्ग स्पर्धकांचा परतीचादेखील होता, तर नाशिककडून त्र्यंबकरोडने पुढे जाताना स्पर्धकांनी मायको सर्कल ते हॉटेल संस्कृतीपर्यंत दुभाजकाच्या ‘डाव्या बाजू’चा वापर केला. तसेच स्पर्धक त्याच मार्गाने पुन्हा फिनिश लाइनपर्यंत परतले. त्यामुळे सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत पर्यंत गडकरी चौक ते उंटवाडी या मार्गावर तसेच मायको सर्कल ते हॉटेल संस्कृतीपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली होती. यासाठी शहर वाहतूक पोलीसांनी विशेष परिश्रम घेतले. वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महामॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक पोलीसांचा बंदोबस्त पुरविण्यात आला. तसेच मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. आणि त्र्यंबकनाका ही वाहतूक एकेरी राहणार आहे.धावपटूंचा उत्साह शाळकरी मुलांनी वाढविलाधावपटूंना उत्साह वाढावा यासाठी मैदानापासून मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी विविध शाळांच्या वाद्यपथकांच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाचे वादन केले. यामध्ये इस्पॅलियर इंग्लीश मिडियम, दिल्ली पब्लीक स्कूल, कोटक महिंद्र, एचडीएफसी होम लोन्ससह विविध शाळांनी सहभाग घेतला. नाशिकमधील अनेक शाळांचे विद्यार्थ्यांनी स्पर्धकांना चीअर केले. प्रत्येक चौकात चीअर करणाºया विद्यार्थ्यांबरोबरच दरवर्षीप्रमाणे नाशिककरदेखील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांच्या उत्साहात भर घातली. त्याशिवाय कलापथक, मॅस्कॉटदेखील स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते.

हेल्थसिटी नाशिकचे नावलौकिकाला मिळतेय बळ - रूचिरा दर्डालोकमत नाशिक महामॅरेथॉनसारख्या उपक्रमामुळे नाशिकच्या सुखद थंडीबरोबरच आल्हाददायक वातावरण, समृद्ध पर्यावरण, हेल्थसिटी म्हणून निर्माण होत असलेल्या नावलौकिकाला अधिक बळ मागील तीन वर्षांपासून मिळत आहे. त्यामुळे नाशिकमधील सर्वच उद्योगांना पूरक असे नाशिकचे ब्रॅँडिंग करण्यातदेखील हा उपक्रम अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. नाशिककर आपल्या आरोग्याविषयी खूपच जागरूक आहे. यामुळे दरवर्षी लोकमत समुहाकडून महाराष्टÑातील पाच मोठ्या शहरांमध्ये आयोजन केल्या जाणाºया महामॅरेथॉनचा श्रीगणेशा पुण्यनगरी नाशिकमधूनच केला जातो. हे यंदाचे तीसरे वर्ष आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नाशिककरांचा उत्साह अधिक वाढलेला दिसून आला. संपुर्ण राज्याला नव्हे तर देशाला नाशिककरांनी ‘अच्छी सेहत चाहते हो, तो दौडना पडेगा’ असा संदेश दिला.- संयोजक, लोकमत महामॅरेथॉन

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटMarathonमॅरेथॉनNashikनाशिकHealthआरोग्य