सभासदांना दुग्ध व्यवसायासाठी कर्जपुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST2021-09-02T04:32:09+5:302021-09-02T04:32:09+5:30

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत पिंगळे बोलत होते. तानाजी पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या गंगापूर मुख्य कार्यालयात ...

Loans will be provided to the members for dairy business | सभासदांना दुग्ध व्यवसायासाठी कर्जपुरवठा करणार

सभासदांना दुग्ध व्यवसायासाठी कर्जपुरवठा करणार

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत पिंगळे बोलत होते. तानाजी पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या गंगापूर मुख्य कार्यालयात ऑनलाईन सभा संपन्न झाली. सभासदांनी ऑनलाईन सहभागी झाले होते. सभेमध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, आर्थिक पत्रके,अंदाजपत्रक, नफा, लेखापरीक्षण अहवालाची नोंद विषयांवर चर्चा होऊन सदर विषय मंजूर केले.

संस्थेस २०२०-२१ आर्थिक वर्षात ३५.३२ लाखांचा नफा झाला संस्थेने २०.४२ कोटी कर्ज वसूल केले. संस्थेने ३.४२ कोटी पीक कर्ज वाटप केले आहे. सभासद सामूहिक अपघात विमा घेतले असून, अपघातामध्ये निधन झालेल्या सभासदांच्या वारसांना १० लाखांचे धनादेश देण्यात आले.

सभेस उपाध्यक्ष अनिल काकड, संचालक देवीदास पिंगळे, दिनकर पाटील, संचालक मधुकर खांडबहाले, पंडित काकड, संदीप पाटील, दौलत पाटील, पूजा थेटे, रामदास पिंगळे, दत्तू थेटे, अरुण पाटील, अनिता चव्हाण, श्रीनाथ थेटे, प्रकाश बोरसे, लेखापाल एस. भोर उपस्थित होते.

Web Title: Loans will be provided to the members for dairy business