१ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप वसाका : गळीत हंगामाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:44 IST2021-03-16T20:50:28+5:302021-03-17T00:44:14+5:30
लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले.

येथील वसाका कार्यस्थळावर हंगाम सांगता कार्यक्रमात गव्हाणीचे पूजन करताना कर्मचारी व पदाधिकारी.
लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले.
यावर्षीच्या गळीत हंगामास अनेक अडचणी येत गेल्या. मात्र प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या सामंजस्याने हंगाम पूर्ण करण्यात आला. धाराशिव प्रशासनाने कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यापूर्वी राज्य शिखर बँकशी करार केला असला तरी वसाका मजदूर युनियन बरोबर करार झालेला नव्हता. यावर्षी मात्र धाराशिव प्रशासन व वसाका मजदूर युनियन तसेच कारखाना अवसायक यांच्यात यशस्वी तडजोड होऊन सर्वसंमतीने युनियनशी सामंजस्य करार झाल्यावर कारखाना सुरु करण्यात आला.
मागील वर्षी कारखाना बंद असल्याने कारखान्याची पाहिजे तसी देखभाल व दुरुस्ती झालेली नव्हती. कारखाना सुरू झाल्यावर अनेकवेळा बंद ठेवावा लागत असल्याने अपेक्षित असे गाळप करता आले नसल्याची खंत धाराशिव कारखान्याच्या प्रशासनाने व्यक्त केली. यावेळी वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, प्रशासकीयअधिकारी मनोहर जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब सावंत, जनरल मॅनेनजर संतोष देवकर, वर्क मॅनेजर चव्हाण, इंजिनिअर फडफळे, संतोष कचोर, विजय नागणे, प्रकाश देवरे, निलेश पाटील, बाळु पवार, मधुकर सोनवणे, नंदकुमार सोनवणे, समाधानक गायकवाड, मुन्ना शिंदे, सुरज पवार, प्रविण मोरे, संजय देवरे आदीसह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, कर्मचारी भगवान सोनवणे यांच्या हस्ते सपत्निक गव्हाणीचे पूजन करण्यात आले.