नाशिक : राज्यभरात विधी शाखेतील पाच व तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठीचे प्रवेश सामूहिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून राबविले जात असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची बुधवारी (दि. २६) अखेरची मुदत आहे. पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ साठी ही प्रवेश परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा मे महिन्यात होणार आहे. गेल्या वर्षापासून सामूहिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून एलएलबीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
एलएलबी सीईटी; आज अखेरची मुदत
By admin | Updated: April 26, 2017 01:31 IST