विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 18:19 IST2019-05-04T18:19:16+5:302019-05-04T18:19:33+5:30
कोळगावला विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान देण्यास ग्रामस्थांना यश आले आहे.

विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान
नगरसूल : कोळगावला विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान देण्यास ग्रामस्थांना यश आले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल येथून जवळच असलेल्या कोळगाव येथील राजेंद्र लक्ष्मण कमोदकर यांच्या गट नंबर १९० मधील विहिरीत मोर पडला. ही माहिती राजापूर वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर वाघ यांना कळविण्यात आली. त्यांनी वनविभागाचे पोपट वाघ व भास्कर वाघ यांना घटनास्थळी जाऊन त्या विहिरीतून मोराला बाहेर काढून व पुढील उपचार करून सोडून देण्यात आले. त्यांना मनोहर पवार, विकास कमोदकर, साईनाथ मोरे, कृष्णा शेळके, संदीप मोरे आदी नागरिकांनी मदत केली.