शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: February 28, 2017 23:59 IST

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.  कडक उन्हामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकाम करणारे मजूर व शेतकरी यांच्याही कामाच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. शेतकरी सकाळी लवकर शेतात जाऊन पिकाना पाणी देणे तसेच मशागतीची कामे करून ११ वाजेनंतर घरी परतत असून, दुपारनंतर ४ वाजच्या दरम्यान पुन्हा शेतकामे करत आहेत. पशुपालकही सकाळी आपली गुरे, मेंढ्या, बकऱ्या आदि जनावरे चरण्यासाठी सकाळी लवकर डोंगरात नेऊन दुपारच्या वेळेस आपली जनावरे झाडाच्या सावली खाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रसवंती, शीतपेय दुकाने सजू लागली आहेत. उन्हामुळे नागरिक हैराण होऊन दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणार नागरिक डोक्यात टोपी अथवा डोक्याला उपरणे बांधून व डोळ्यावर गॉगल लावून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. काही महिला तर डोक्याला रु माल किंवा स्कार्प बांधून बाहेर पडतात.  आठवड्यातून काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्री वीजपुरवठा नसतो. तेव्हा या वेळेस पंखे बंद असतात. घरासमोरील पडवित किंवा एखाद्या झाडाखाली बसावे लागते. या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, पशुपालक याचे वेळापत्रक बदलले आहे. (वार्ताहर)