शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दुहेरी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:13 IST

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चुलत भावाने बहिणीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले असता त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या महिलेवरही चाकूने वार केल्यानंतर उपचारा दरम्यान त्या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना २०१३ साली शिवाजी चौकात घडली होती.

नाशिक : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चुलत भावाने बहिणीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले असता त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या महिलेवरही चाकूने वार केल्यानंतर उपचारा दरम्यान त्या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना २०१३ साली शिवाजी चौकात घडली होती. या दुहेरी खून प्रकरणी आरोपी नितीन सुभाष पवार यास मंगळवारी (दि.२६) जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व १३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.आरोपी नितीन पवार व त्याची चुलत बहीण मेघा राजेश नवलाख यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहारातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून दोघा चुलत बहीण-भावात वादविवाद झाला. त्याचा राग मनात धरून नितीन ६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघा यांच्या शिवाजी चौकातील राहत्या घरात शिरला व त्याने चाकूने मेघावर वार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आईवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या मुलीचा आरडाओरड ऐकून शेजारी राहणाऱ्या ऋतुजा या मदतीला धावून आल्या. त्यांच्यावरही त्याने चाकूने हल्ला चढविला. या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश सुचित्रा घोडके यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. व्ही. एस. तळेकर यांनी युक्तिवाद केला. यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह वैद्यक ीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा व सत्र न्यायधीश घोडके यांनी न्यायालयापुढील साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी नितीन पवार यास दोषी धरले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग