शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By admin | Updated: March 3, 2017 00:30 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील काळेवाडी येथे गुरुवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील काळेवाडी येथे गुरुवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ठाणगाव-काळेवाडी रस्त्यावर पाचखळा वस्ती आहे. मधुकर नरहरी आव्हाड यांची शेत गट नंबर १०८० मध्ये शेती आहे. शेतात आव्हाड यांनी जनावरांसाठी झाप बांधलेला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी आव्हाड यांनी झापात दोन गायी बांधल्या व गावातील घरी आले. गुरुवारी पहाटे बिबट्याने झापात प्रवेश करून गायीचा फडशा पाडला. गुरुवारी पहाटे आव्हाड दूध आणण्यासाठी मळ्यात गेल्यानंतर त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास आव्हाड यांच्या वस्तीवर बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज येत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. ्रआव्हाड यांनी पहाटे वस्तीवर गेल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाचे वनरक्षक तानाजी भुजबळ, शंकर शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.काळेवाडी शिवारातील पाचखळी भागात बिबट्याचा नेहमी वावर असतो. उन्हाळा सुरू होताच जंगलात टंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे वन्यप्राणी वस्तीवर पाणी पिण्यासाठी येऊ लागले आहेत. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)