शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

महालखेडा शिवारात बिबट्या जेरबंद

By admin | Updated: March 3, 2017 00:27 IST

येवला : तालुक्यातील महालखेडा परिसरात बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळून आले. गुरुवारी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात त्याला अटकण्यात आला.

येवला : तालुक्यातील महालखेडा परिसरात गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या विहिरीत पडल्याचे आढळून आले. गुरुवारी (दि. २) सकाळी १० वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात त्याला अटकण्यात आला.महालखेडा परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याची चाहूल असल्याचे वस्तीवरील ग्रामस्थांना लागली होती. त्याबाबत परिसरात चर्चाही होती. दरम्यान, मंगळवारी रात्री या बिबट्याने महालखेडा परिसरात तुळशीराम डोलणार यांच्या वस्तीवर एका शेळीला फस्त केले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. निफाड वनविभागाचे अधिकारी व पथकाने या भागात बुधवारी भेट देऊन तपास केला होता. परंतु काहीही आढळून आले नव्हते. गुरुवारी सकाळी ९ वाजता महालखेडा येथील शेतकरी बाळासाहेब ताडगे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला असल्याचे लक्षात आले.भ्रमणध्वनीवरून निफाड वनविभागाशी संपर्क साधून पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेनसह पिंजरा व सर्व साहित्य घेऊन पथक महालखेड्यात दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात आला. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बुधवारी रात्री बिबट्या विहिरीत पडल्यानंतर येवला प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी बी.आर. ढाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार वनरक्षक अशोक काळे, प्रसाद पाटील,वनपाल योगीता खिरकाडे, वनसेवक दिलीप अहिरे, कर्मचारी योगेश काळे, पिंटू नहिरे, रामचंद्र गंडे, भरत माळी, विजय लोंढे यांच्या पथकाने विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला पकडण्याची कामगिरी केली. बिबट्या हा पाच ते सहा महिन्याचा असल्याचे वनविभागाने सांगितले. (वार्ताहर )