शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा बालिकेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:35 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील आठ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली.

ठळक मुद्देबंदोबस्त करण्याची मागणी : गावकऱ्यांच्या सतर्कतेने जीव वाचला

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगालवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील आठ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आरडाओरड केली. लगेच गावकरी धावल्याने मुलीचे प्राण वाचले.
एकाच आठवड्यात परिसरातील ही दुसरी घटना असल्याने गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
हा अंगावर शहारे आणणारा भयावह प्रसंग चिचगाव येथील ऐश्वर्या राजेश्वर अलोणे या बालिकेवर ओढवला. राजेश्वर अलोणे व मुलगी ऐश्वर्या जेवणानंतर गावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने घराच्या अंगणात उभे होते. त्याचवेळी अंधारात घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने ऐश्वर्यावर हल्ला करीत ऐश्वर्याची मान जबड्यात पकडली. त्याच वेळी राजेश्वरने बिबट्याचा मागचा पाय पकडून मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केली व क्षणात गावातील लोक गोळा झाले. अखेर बिबट्याने जवळपास ३०० मीटर अंतरावर ऐश्वर्याला सोडले व जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. क्षणाचाही विलंब न लावता राजेश्वरने गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अवस्थेत ऐश्वर्याला ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. झाल्या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारीदेखील ग्रामीण रुग्णालयात आले. ऐश्वर्याच्या जखमांवर उपचार करण्यात आला. तिची प्रकृती आता चिंताजनक आहे. मात्र एकाच आठवड्यात परिसरात दोनदा बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
विजय वडेट्टीवारांनी घेतली दखल
दरम्यान क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे एका कार्यक्रमानिमित्याने ब्रह्मपुरी येथे मुक्कामी होते. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. आ.वडेट्टीवार यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात येताच ऐश्वर्याच्या उपचाराची व प्रकृतीची विचारपूस करीत आणखी चांगले उपचार करण्यासाठी मुलीचे वडील राजेश्वर यांना तात्काळ आर्थिक मदत केली.यावेळी उपस्थित वनविभागाचे अधिकारी यांना बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा. जंगलव्याप्त गावाशेजारील वाढलेले गवत काढून वन्यप्राण्यांना दबा धरण्यासारखी ठिकाणे नष्ट करा अश्या सूचना दिल्या.उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी आशा चौहान व नायगमकर यांनी मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च वनविभाग करेल व गावालगत असलेले गवत काढण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे आश्वस्त केले. यावेळी जि. प.सदस्य प्रा.राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, माजी नगरसेवक विलास विखार, गोवर्धन दोनाडकर, प्रा. श्याम कंरबे व चिंचगाव ग्रामवासीय उपस्थित होते.

टॅग्स :leopardबिबट्या