शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

वनोद्यानाच्या नियमांचा पर्यटकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:10 PM

नाशिक : टाटा ट्रस्ट व नाशिक महानगरपालिकेने विकसित केलेल्या व वनविकास महामंडळाकडे ताबा असलेल्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानात प्रवेश नियमांच्या गोंधळामुळे पर्यटकांना फटका बसत आहे.साधारण वर्षभरापूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानाचा (नक्षत्र उद्यान) टाटा ट्रस्टच्या मदतीने नूतनीकरण कथा अरण्याची हा प्रकाश योजनेचा लेझर शो आदी गोष्टींची निर्मिती करण्यात आली आहे. ...

ठळक मुद्देवेळमर्यादेचे बंधनआधी उद्यान मग शोसाठी तिकिटे

नाशिक : टाटा ट्रस्ट व नाशिक महानगरपालिकेने विकसित केलेल्या व वनविकास महामंडळाकडे ताबा असलेल्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानात प्रवेश नियमांच्या गोंधळामुळे पर्यटकांना फटका बसत आहे.साधारण वर्षभरापूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानाचा (नक्षत्र उद्यान) टाटा ट्रस्टच्या मदतीने नूतनीकरण कथा अरण्याची हा प्रकाश योजनेचा लेझर शो आदी गोष्टींची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र येथे प्रवेशाच्या नियमावलीवरून गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. उद्यान बघणाºयांसाठी प्रतिव्यक्ती तीस रुपये शुल्क असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच उद्यान बघू दिले जाते. नंतर त्यांना बाहेर घालविले जाते. लेझर शोसाठीची तिकीटविक्र ी सायंकाळी साडेसहाला सुरू होते. उद्यान व लेझर शोची एकत्रित तिकिटे दिली जात नसल्याने पर्यटकांची अडचण होत आहे. ज्यांना दोन्हींचा आनंद घ्यायचा आहे, त्यांना साडेपाच ते साडेसहा बाहेर रस्त्यावर थांबून रहावे लागते.साडेसहा वाजता प्रथम सात वाजेच्या शोची तिकिटे दिली जातात. शो सुरू झाल्यावर आठच्या शोची बुकिंग सुरू केली जाते. सात वाजेचा शो सातला सुरू होणे अपेक्षित असताना सातच्या आतच सुरू केला जातो. सात ते साडेसात असा शो असूनही तो बावीस मिनिटांचाच असल्याचा तेथील कर्मचारी सांगतात. मात्र शो अठरा मिनिटांतच संपविला जातो, अशीदेखील काही नागरिकांची तक्रार आहे. प्रवेशद्वारावरचे तिकीट काउंटर ते लेझर शो हे अंतर खूप असल्याने शेवटच्या पर्यटकांना शोसाठी धावतपळत जावे लागते. तिथले कर्मचारी शो सुरू होत आहे, असे ओरडून सांगत असल्याने ही उद््घोषणेची कोणती पद्धत, असा सवाल उपस्थित केला जातो.

टॅग्स :NashikनाशिकPandav cavesपांडवलेणी