शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाकाठी एका कामाचे लोकार्पण

By admin | Updated: July 27, 2014 00:15 IST

दिवसाकाठी एका कामाचे लोकार्पण

 

नाशिक : स्थानिक विकास निधीतून आमदारांकडून सुचविण्यात येत असलेल्या कामांची संख्या व वर्षाअखेर पूर्ण झालेल्या कामांची संख्या पाहता, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत दिवसाकाठी एक विकासकाम पूर्ण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातही जवळपास ५९४ कामांचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींना सादर केला असला तरी, मार्चअखेरपर्यंत ही सारी कामे पूर्ण होण्याची प्रशासनाला आशा आहे. राज्य सरकारकडून मतदारसंघात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक आमदाराला वर्षाकाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातूनच संपूर्ण मतदारसंघातून नागरिकांच्या मागणीनुसार कामे जिल्हा नियोजन कार्यालयाकडे आमदारांकरवी प्रस्ताव सादर केला जातो व अशा कामांचे अंदाजपत्रक तयार करून, नंतर त्याला प्रशासकीय मान्यता व पुढे कार्यारंभ आदेश देऊन काम पूर्ण केले जाते. कामाच्या प्रगतीवरच संबंधित ठेकेदाराला वा यंत्रणेला देयके अदा केली जातात. नाशिक जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात १५ आमदारांना प्राप्त झालेल्या सुमारे ३६ कोटी ६८ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीतून जवळपास ५९४ कामे मंजूर करण्यात आली आहेत. तर सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीतून ५७० कामे मंजूर करून प्रत्यक्षात हाती घेण्यात आली होती. दोन्ही वर्षांत सुमारे ११६४ इतकी कामे आमदार निधीतून सुरू केली असता, त्यातील ७७७ कामे पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण ही झाले आहे, तर जवळपास ३८७ कामे अजूनही प्रगतिपथावर आहेत. आमदार निधीतून सुचविण्यात आलेल्या बहुतांशी कामांना प्रशासकीय मान्यता दिली जाते, अपवाद फक्ततांत्रिक कारणांचा असून, त्यातही विकासकामासाठी जागेचा अभाव वा स्थानिक नागरिकांचा विरोध असला तरच कामे केली जात नाहीत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात आमदारांनी जे काही प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केले आहेत, अशा सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. अशीच परिस्थिती संपलेल्या आर्थिक वर्षाचीही असल्याने शासकीय पातळीवर एकही प्रस्ताव पडून नसल्याचे आढळून आले आहे. आजवर झालेल्या विकासकामांवर ३१ कोटी ७३ लाख ६६ हजार रुपये इतका खर्च झाला असून, जेमतेम चार कोटी ९४ लाख, ९० हजार इतकी रक्कम सन २०१४-१५ या वर्षांसाठी वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी विद्यमान आमदारांना मिळणारे दोन कोटी व उर्वरित गेल्या वर्षाचा सुमारे पाच कोटींचा निधी अशा जवळपास ३५ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या म्हणण्यानुसार आॅगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता गृहीत धरून विद्यमान लोकप्रतिनिधींनी एप्रिल महिन्यातच मतदारसंघात करावयाच्या कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पूर्ततेसाठी पाठविले आहेत. त्यातील बहुतांशी कामांना मंजुरीही देण्यात येऊन सध्या त्यांची निविदा व ठेकेदाराची निश्चिती केली जात आहे. त्यामुळे आमदारांचा कार्यकाल जरी संपुष्टात आला तरी, त्यांनी सुचविलेली कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्यात कोणतीही अडचण नाही. (प्रतिनिधी)