शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

अखेरचा दिवस बंडखोरांचा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:04 IST

विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासून काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली अखेरच्या दिवशी गतिमान होऊन प्रत्येक मतदारसंघात राजी-नाराजीचे प्रदर्शन घडवीत बंडखोरांनी शक्तिप्रदर्शनाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या या नाट्यमयी घटनांमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली तर काहींनी बंडखोरी करीत स्वकीयांसमोर आव्हान उभे केले असले तरी, सोमवारी माघारीनंतरच त्यामागचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देराजी-नाराजी नाट्य रंगलेऐनवेळी नाट्यमय घडामोडींना वेग

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासून काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली अखेरच्या दिवशी गतिमान होऊन प्रत्येक मतदारसंघात राजी-नाराजीचे प्रदर्शन घडवीत बंडखोरांनी शक्तिप्रदर्शनाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या या नाट्यमयी घटनांमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली तर काहींनी बंडखोरी करीत स्वकीयांसमोर आव्हान उभे केले असले तरी, सोमवारी माघारीनंतरच त्यामागचे चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमीअधिक प्रमाणात राजी-नाराजीचे चित्र पहावयास मिळाले असून, त्यात नाशिक पूर्व मतदारसंघातील राजकीय घटनांनी वेगळेच वळण घेतले. भाजपच्या अखेरच्या यादीतही विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी न देण्यात आल्याने सकाळी त्यांच्या समर्थक व हितचिंतकांनी सानप यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याने राष्टÑवादी कॉँग्रेस सानप यांच्यासाठी धावून आली, तर सानप यांच्याऐवजी भाजपने मनसेचे राहुल ढिकले यांच्या हातात कमळ दिले. ढिकले यांना उमेदवारी व अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन भाजपने केले. त्यानुसार सकाळी १० वाजता भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयापासून शक्तिप्रदर्शन करीत ढिकले यांनी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनातून सानप समर्थकांनी मात्र दोन हात राहणेच पसंत केले.दुसरीकडे सानप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परंतु राष्टÑवादीचे बहुतेक पदाधिकारी व कार्यकर्ते येवला येथे छगन भुजबळ यांचा अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्याने स्थानिक मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सानप यांनी नामांकन दाखल केले. या मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे कॉँग्रेस आघाडीच्या जागावाटपात कॉँग्रेसच्या वाट्याला नाशिक पूर्व मतदारसंघ सोडलेला असताना राष्टÑवादीने सानप यांना अधिकृत ए व बी फॉर्म देऊन उमेदवारी दिली. त्याच दरम्यान, कॉँग्रेसने ही जागा रिपाइंच्या कवाडे गटाला सोडल्यामुळे तेथून रिपाइंचे गणेश उन्हवणे यांनीही अर्ज दाखल केला.पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने जाहीर केल्याप्रमाणे सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे व विलास शिंदे यांनी आपापल्या सिडको-सातपूरमधून रॅली काढली. जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाला सुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेत असंतोष निर्माण झाला असून, सेनेच्या तिघांनी बंडखोरी केली आहे.माघारीपर्यंत तिघा बंडखोरांमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न केला जाईल व त्यापैकी एक कोणीही उमेदवार असेल, असे तिघांनी संयुक्तपणे जाहीर केले. सेनेच्या इच्छुकांकडून बंडखोरी केली जात असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. त्याचबरोबर भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झालेले दिलीप भामरे यांनीही पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भामरे हे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीला महत्त्व प्राप्त झाले आहे.नाशिक पश्चिममध्ये राष्ट्रवादीचे माकपला समर्थन अन् उमेदवारीही दाखलमहाराष्टÑ नवनिर्माण सेनेने निवडणुकीच्या तोंडावर सेनेतून आलेले नगरसेवक दिलीप दातीर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनीही अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून कॉँगे्रस आघाडीने माकपा उमेदवार डॉ. डी.एल. कराड यांना पाठिंबा दिलेला असून, कराड यांनी कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांसमक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; परंतु अपूर्व हिरे यांनीदेखील आपण राष्टÑवादीचे उमेदवार असल्याचे सांगून उमेदवारी दाखल केली आहे.नाशिक मध्य मतदारसंघातून कॉँग्रेसने अगोदर शाहू खैरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु रात्रीतून कॉँग्रेसने उमेदवारी ऐनवेळी बदलली व नगरसेवक हेमलता पाटील यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या काही वेळेपूर्वी अर्ज दाखल केला. पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याचे उशिराने सांगण्यात आल्याने त्यांची ऐनवेळी धावपळ झाली. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या चारही उमेदवारांनी सकाळी पक्षाच्या कार्यालयाजवळ एकत्र येत शक्तिप्रदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने निवडणुकीच्या तोंडावर सेनेतून आलेले नगरसेवक दिलीप दातीर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनीही अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून कॉँगे्रस आघाडीने माकपा उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांना पाठिंबा दिलेला असून, कराड यांनी कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांसमक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु अपूर्व हिरे यांनीदेखील आपण राष्टÑवादीचे उमेदवार असल्याचे सांगून उमेदवारी दाखल केली आहे.नाशिक मध्य मतदारसंघातून कॉँग्रेसने अगोदर शाहू खैरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु रात्रीतून कॉँग्रेसने उमेदवारी ऐनवेळी बदलली व नगरसेवक हेमलता पाटील यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या काही वेळेपूर्वी अर्ज दाखल केला. पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याचे उशिराने सांगण्यात आल्याने त्यांची ऐनवेळी धावपळ झाली. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या चारही उमेदवारांनी सकाळी पक्षाच्या कार्यालयाजवळ एकत्र येत शक्तिप्रदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस