लासलगावी ऐक्य परिषद

By Admin | Updated: January 1, 2017 23:25 IST2017-01-01T23:25:38+5:302017-01-01T23:25:58+5:30

मान्यवरांचे मत : जातीय सलोखा काळाची गरज

Lasalgavi Congregation Council | लासलगावी ऐक्य परिषद

लासलगावी ऐक्य परिषद

लासलगाव : येथे जनजागरण समितीतर्फे जातीय सलोखा राखण्यासाठी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं जातीय सलोखा ऐक्य परिषद संपन्न झाली. याप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मनोगतातून जातीय सलोखा ही काळाची गरज असल्याचे नमूद केले . बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी राज्यभर निघत असलेल्या विविध समाजांच्या मोर्चांवर बोलताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक समाजातील तरुणांनी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. रवींद्र जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोर्चाच्या निमित्ताने कोणत्याही एका समाजाला टार्गेट करू नये, असे सांगितले. या परिषदेचे संयोजन लासलगाव रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामनाथ शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, राजाभाऊ आहिरे, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, संजय कासट, पंकज पारख,गुणवंत होळकर, रवि होळकर, सतीश पवार, मोसीन पठाण, डॉ. अमोल शेजवळ, प्रा. बगाडे, महेश बाफना, फिरोज मोमीन, संजय गायकवाड, अर्चना दरगुडे, सागर अहिरे, सोनू शेजवळ, कैलास केदारे, सर्जेराव वाघ आदि उपस्थित होते.








 

Web Title: Lasalgavi Congregation Council